महाराष्ट्रासह पाच राज्यांना कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्रासह पाच राज्यांना कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने डोके वर काढले आहे. कोरोना विषाणूच्या एव्हाय.4.2 या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. देशातील कर्नाट

व्यापारी संकुलातील गाळे वाटपाची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करावी मंत्री छगन भुजबळ
नागवडे कारखान्याची बदनामी थांबवा.. आरोप सिद्ध झाल्यास राजीनामा देऊ
सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने शहरातून काढण्यात आली शोभायात्रा 

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने डोके वर काढले आहे. कोरोना विषाणूच्या एव्हाय.4.2 या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. देशातील कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, जम्मू-काश्मीर आणि महाराष्ट्रात एव्हाय.4.2 व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहेत. हा नवा व्हेरियंट डेल्टाप्लस व्हेरिएंटचा प्रकार असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली.
मध्यप्रदेशातील इंदोर येथे जीनोम सिक्वेन्सिंग तपास अहवालात एव्हाय-4 चे नवीन व्हेरिएंट आढळून आले. नमुन्याच्या चाचणी अहवालात नव्या व्हेरिएंटची 7 प्रकरणे समोर आली.हा व्हेरिएंट अधिक संसर्गक्षम वाटत असला, तरी घातक असल्यासारखं वाटत नाही. त्यामुळे घाबरण्याची काही गरज नाही, असं मत इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेतल्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. तरीही नागरिकांनी कोविडच्या अनुषंगाने आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत देशात कोरोनाच्या एव्हाय.4.2 या व्हेरिएंटचे 17 नमुने सापडले आहेत.
आयसीएमआरच्या शास्त्रज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवा डेल्टा व्हेरिएंट जास्त संसर्गक्षम वाटत आहे. तसंच तो यापेक्षाही जास्त संसर्गक्षम असू शकतो. विषाणू स्वतःला जिवंत राखण्यासाठी स्वतःमध्ये असे बदल करत जातो. कारण त्याला होस्टचे शरीर म्हणजेच मानवी शरीरात राहण्याची आवश्यकता असते; मात्र हा व्हेरिएंट घातक आहे की नाही, याबद्दल आत्ताच काही सांगणे कठीण आहे. आपण पॅनिक होऊन चालणार नाही. त्याऐवजी आपली सतर्कता आणि दक्षता वाढवली पाहिजे. कोविडच्या अनुषंगाने आपले व्यवहार योग्य ती काळजी घेऊन करणे गरजेचे आहे. बेपर्वाईने वागणे योग्य नसल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले. जीआयएसएआयडीने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या एव्हाय.4.2 या व्हेरिएंटच्या देशात सापडलेल्या 17 नमुन्यांमध्ये आंध्र प्रदेशातल्या 7, कर्नाटकातल्या 2, तेलंगणमधल्या 2, केरळमधल्या 4 आणि जम्मू-काश्मीर व महाराष्ट्रातल्या प्रत्येकी एका नमुन्याचा समावेश आहे. अमेरिकी शास्त्रज्ञ एरिक टोपोल यांनी 24 ऑक्टोबरला केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटलं होतं, ’डेल्टा प्लस नावाने ओळखल्या जाणार्‍या कोरोनाच्या एव्हाय.4.2 या डेल्टा व्हेरिएंटच्या सब लायनेजचे 10 टक्के रुग्ण ब्रिटनमध्ये अलीकडेच सापडले असून, त्यांच्या सिक्वेन्समुळे चिंता वाढली आहे.’

COMMENTS