जादा कोरोनाबाधित असलेल्या महाराष्ट्रासह पाच राज्यांना मागणीच्या तुलनेत फारच कमी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे.
नवीदिल्लीः जादा कोरोनाबाधित असलेल्या महाराष्ट्रासह पाच राज्यांना मागणीच्या तुलनेत फारच कमी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रात ऑक्सिजन न मिळाल्याने कित्येक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यातच परदेशातून भारतात ऑक्सिजन टँकर आणण्यात आले आहेत. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या आणि 54 टक्के रुग्णसंख्या असलेल्या पाच राज्यांमध्ये केंद्र सरकारने केवळ 42 टक्के लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, आठ मे पर्यंत केंद्र सरकारने राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना दररोज जहा हजार टन ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे. यासोबत राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या ऑक्सिजनच्या मागणीत वाढ झाली आहे. दोन आठवड्यांमध्ये फक्त ऑक्सिजनच्या वाटपामध्ये 22 टक्के वाढ झाली आहे. 11 मे पर्यंत देशात 37.15 लाख अॅक्टिव रुग्ण होते त्यापैकी 20.12 लाख रुग्ण हे केवळ पाच राज्यांमध्ये होते. यामध्ये महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि राजस्थानचा समावेश आहे. या पाच राज्यांमध्ये जहा हजार 140 टन ऑक्सिजनपैकी दरदिवशी चार हजार 306 टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. आठ मेच्या अहवालानुसार महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेशसोबत गुजरात आणि मध्य प्रदेशात पाच हजार 326 टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला होता. 11 मे रोजी या राज्यांमध्ये 16.36 लाख अॅक्टिव रुग्ण होते, जे एकूण अॅक्टिव रुग्णसंख्येच्या 44 टक्के होते.
ऑक्सिजन वाटण्याची प्रक्रिया एका सूत्राच्या आधारे निश्चित केली जाते. राज्यातील अॅक्टिव रुग्णांची माहिती मिळताच ऑक्सिजनची मागणीचा अंदाज लावला जातो, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. 27 एप्रिलच्या आकडेवारीनुसार या पाच राज्यांपैकी कर्नाटकला मिळालेल्या ऑक्सिजनमध्ये वाढ झाली आहे. 802 टनांवरून ही वाढ एक हजार 15 टनांपर्यंत करण्यात आली. बाकीच्या चार राज्यांना कोणतीही वाढ देण्यात आली नाही. दिल्ली राज्याने 700 टनाची मागणी केली असता त्यांना दरदिवशी 590 टन ऑक्सिजन देण्यात आला.
COMMENTS