महाराष्ट्रात राजकीय भूकंप? ; अमित शाह-शरद पवार यांच्या कथित भेटीची वावटळ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्रात राजकीय भूकंप? ; अमित शाह-शरद पवार यांच्या कथित भेटीची वावटळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या दोन दिवसांपूर्वी अहमदाबादेत भेट घेतल्याचे वृत्त आल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात भूकंपाचे धक्के बसले आहेत.

नवी मुंबईतील भूमिपूत्रांकडून आज सिडकोला 1 लाख लोकांचं घेराव आंदोलन केलं आहे l पहा LokNews24
पुण्यात जनावरांचे मृतदेह विद्युत दाहिनीत करणार दहन
हिवरसिंगा मधील चिमटा सर्वे.न. साठी नवीन विद्युत ट्रन्सफार्मर तात्काळ मंजूर करावा – ना.धनजंय मुंडे

मुंबई, अहमदाबाद / प्रतिनिधीः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री  अमित शाह, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या दोन दिवसांपूर्वी अहमदाबादेत भेट घेतल्याचे वृत्त आल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात भूकंपाचे धक्के बसले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने भेटीचे वृत्त नाकारले असले, तरी शाह यांनी भेटीचे संकेत दिले आहेत. राज्यातील गेल्या दीड महिन्यांतील वेगवेगळ्या राजकीय धडामोडीमुळे राज्यात नवी राजकीय समीकरणे आकाराला येण्याची  चर्चा चालू आहे. 

राजकीय विश्लेषक मात्र असे काही घडणार नसल्याचे सांगतात. शरद पवार यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह शाह यांची अहमदाबादमध्ये भेट घेतल्याचे वृत्त समोर आले. हे वृत्त राष्ट्रवादी काँग्रेसने फेटाळून लावले आहे, तर शाह यांनी सूचक विधान करत भेटीचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. २६ मार्च रोजी अहमदाबादमधील एका फार्म हाऊसवर पवार-शाह यांची भेट झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. पवार-शाह यांच्या गुप्त भेटीचे वृत्त राष्ट्रवादी काँग्रेसने फेटाळून लावले आहे. या भेटीच्या वृत्तावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, की पवार आणि पटेल हे दोन्ही नेते अहमदाबादमधून थेट मुंबईला आले. ते कोणालाही भेटले नाहीत. एका गुजराती दैनिकात त्यांनी शाह यांची भेट घेतल्याची बातमी आली आहे. हे भाजपचे षडयंत्र आहे. पवार यांनी शाह यांची भेट घेतल्याची बातमी निव्वळ अफवा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसे भेटीचे वृत्त फेटाळून लावले असले, तरी शाह यांनी दिलेल्या प्रतिक्रियेने भेटीचा सस्पेन्स काय आहे. दिल्लीत शाह यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांना पवारांसोबतच्या भेटीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर “सगळ्याच गोष्टी सार्वजनिकपणे केल्या जात नाहीत”, असे उत्तर शाह यांनी दिले. त्यामुळे पवार-शाह यांची भेट झाली की, नाही? हा सस्पेन्स मात्र कायम आहे.

नव्या पिढीला भेटीचा अर्थ कळणार नाही

पवार यांनी शाह यांच्या घेतलेल्या भेटी चे वृत्त राष्ट्रवादी काँग्रेसने फेटाळले असले, तरी ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी मात्र पवार यांच्या देशातील अनेक नेत्यांशी असलेल्या संबंधाचा उल्लेख करून पवार यांच्या शाह यांच्या भेटीचा अर्थ कळणार नसल्याचे म्हटले आहे, त्यामुळे गोंधळ आणखी वाढला आहे. त्यातही भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील एका नेत्याची प्रतिक्रिया भेट झाल्याचे सूचित करणारी आहे.

COMMENTS