महाराष्ट्रात काका- पुतण्या संघर्षाचा नवा अध्याय.. पुतण्याने साधला निशाणा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्रात काका- पुतण्या संघर्षाचा नवा अध्याय.. पुतण्याने साधला निशाणा

प्रतिनिधी : मुंबई महाराष्ट्रात पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्याचा संघर्ष पाहावयास मिळण्याची शक्यता आहे. नात्याने काका - पुतणे असलेल्या उद्धव ठाकरे

न्यायव्यवस्थाच बुडाखाली घेण्याचा डाव
उद्धव ठाकरेंची पुन्हा पक्षप्रमुखपदी होणार निवड
कुणाच्या म्हणण्यावर सेना चालत नाही; पूर्ण मुलाखत होऊ द्या.

प्रतिनिधी : मुंबई

महाराष्ट्रात पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्याचा संघर्ष पाहावयास मिळण्याची शक्यता आहे. नात्याने काका – पुतणे असलेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यात हा संघर्ष होऊ शकतो. 

मुंबईतील (Mumbai) रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे अनेकांना आपले जीवही गमवावे लागले. यावरून मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray)यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून शिवसेनेवर(Shivsena) हल्लाबोल केला .

पोस्टमध्ये अमित ठाकरे म्हणाले, स्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे होणारे ट्रॅफिक जॅम, अपघात, वाया जाणारे इंधन या गोष्टींमुळे अगदी सर्वांचंच कंबरडं मोडलंय, पण सत्ताधारी राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या भ्रष्टाचारी आघाडीला त्याच्याशी काही देणंघेणं नाही. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खड्डेविरोधी आंदोलनं करतोय. त्यात उच्च न्यायालयात वारंवार खोटं बोललं जात असेल तर जनतेच्या न्यायालयात त्यांना शिक्षा होऊ शकेल , अशा शब्दात अमित ठाकरे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला .

त्यामुळे आगामी काळात हा संघर्ष आणखीनच वाढणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

COMMENTS