महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणाचे वास्तव !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणाचे वास्तव !

महाराष्ट्राच्या राजकारणात जातीचे राजकारण कधी सुरू झाले यावर आता चर्चा सुरू आहे. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारताचे र

डंपरच्या चाकाखाली येऊन चार वर्षाच्या चिमूर्डीचा मृत्यू
राहुरी कृषी बाजार समिती होणार डिजिटल ः अरूण तनपुरे
महाराष्ट्रातील 1984 चे दंगलग्रस्त मदतीपासून अजूनही वंचित ; पंतप्रधान मोदींना घातले साकडे

महाराष्ट्राच्या राजकारणात जातीचे राजकारण कधी सुरू झाले यावर आता चर्चा सुरू आहे. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारताचे राजकारण हेच जातीपाती वर आधारलेले आहे. राजकुमार जातीपातीच्या या राजकारणाची सुरुवात स्वातंत्र्योत्तर काळातील काॅंग्रेस, कम्युनिस्ट  आणि जनसंघ यांनी केली आहे. राज ठाकरे हे राजकारणात असले तरी त्यांचे राजकीय इतिहासाचे ज्ञान तोकडेच नाही तर, शुन्यवत आहे, असेच म्हणावे लागेल. त्यांनी परवा केलेल्या भाषणात शरद पवार यांनी महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण १९९९ पासून सुरू केल्याचा आरोप केला आहे. अर्थात शरद पवार यांनी महाराष्ट्रातील राजकारणात बहुजातीय स्तर आणला; परंतु मराठा डॉमिनेट राजकारण पुढे करण्यात त्यांच्या आधी यशवंतराव चव्हाण यांच्या पासूनच या राजकारणाची सुरुवात होते. महाराष्ट्रातील मराठा नेत्यांचे राजकीय वर्चस्व हे महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा प्रवाह यामुळेच निर्माण झाले, हा इतिहास मराठा समाजही विसरतो आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य करणारेही विसरतात. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक प्रवाहाला पुढे नेणाऱ्या जेधे जवळकर यांची सामाजिक शक्ती लक्षात आल्यानंतर पंडित नेहरू यांनी देशातील सर्व प्रथम असणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र, जे देशातील उच्च जातीय समूहाला सामाजिक पातळीवरून राजकीय परिघावरूनही बाहेर करू शकते; अशा प्रकारचा पूर्वअंदाज घेतल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय सत्ता ब्राह्मणेतर समाजाकडे सोपविण्याचा घेतलेला निर्णय म्हणजेच महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा जात समूहाचा राजकीय सत्तेतील उदय. हा इतिहास ज्यांना ज्ञात नाही त्यांनी राजकीय भाष्य करणेही चुकीचे आहे. जेधे – जवळकर यांनी महाराष्ट्रात निर्माण केलेली सामाजिक शक्ती महात्मा फुले यांच्या विचारांवर आधारलेली होती. त्या विचारशक्तीला सर्वप्रथम सुरुंग लावला, तो म्हणजे महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणविले जाणारे यशवंतराव चव्हाण यांनी!  यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रातील सामाजिक दृष्ट्या जागृत असणाऱ्या समाज समूहांना जातीत विभाजित करण्याचे राजकीय षड्यंत्र सर्वप्रथम उपयोगात आणले. महाराष्ट्रातील ओबीसी समुदाय राजकीयदृष्ट्या जागृत नसल्यामुळे त्यांचा केवळ मतदार म्हणून वापर करीत राहणं एवढीच मर्यादित खेळी राजकारणामध्ये त्यांनी केली. यशवंतराव चव्हाण यांनी सर्वप्रथम महाराष्ट्रात राजकीय जागृती असणाऱ्या दलितांमध्ये बौद्ध विरुद्ध दलित अशी विभागणी करण्याचे राजकीय षड्यंत्र सर्वप्रथम उपयोगात आणले. ओबीसी समाज संख्येने प्रचंड मोठा असतानाही यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना राजकीय सत्तेत सहभागी करून घेतले नाही. प्रभात वसंतराव नाईक यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यात यशवंतराव चव्हाण यांची भूमिका पूर्णपणे राहिली हे देखील वास्तव आहे. मात्र याच वसंतराव नाईकांनी ओबीसी जाती न सत्ता संघात खेचण्यात ऐवजी  महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये शिवसेनेसारख्या पक्षाची स्थापना करण्यात आतून मदत केली त्यामुळेच शिवसेनेला सुरवातीच्या काळात  प्र. के. अत्रे हे वसन्तसेना म्हणून संबोधायचे. वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला राज्याच्या सत्ताकारणात अधिक प्रमाणात घेतले असते तर महाराष्ट्राचे सत्ताकारण मराठा डॉमिनंट न राहता ते बहुजन किंवा बहुजातीय स्तराचे सत्ताकारण बनले असते.  त्यानंतर त्यांचे शिष्य म्हणवले जाणारे शरद पवार यांनी देखील राजकारणात जातीय समीकरणे निश्चितपणे उपयोगात आणली. जे राज ठाकरे हे महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण शरद पवार यांनी रुजविल्याचा आरोप करतात त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राचे राजकारण ब्राह्मण डॉमिनंट करण्याचाच प्रयत्न केला होता. त्यामुळे बहुजन समाज किंवा राज्यातील ओबीसी जाती पाठीशी असतानाही शिवसेनेची सत्ता महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी सर्वात आधी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनविण्यासाठी ब्राह्मण व्यक्तीची निवड केली. त्यांची ही निवड देशामध्ये महात्मा गांधी यांचा खून झाल्यानंतर महाराष्ट्रात सर्वात प्रथम ब्राह्मण जातीचे राजकीय पुनर्वसन करण्यात त्यांची भूमिका अग्रेसर राहिली. एका अर्थाने जाती-पातीचे राजकारण सत्ताधारी जात वर्गाने खालच्या जातीकडे नेण्याऐवजी वरच्या जातीकडे नेण्याचा, जो प्रकार महाराष्ट्राने पाहिला तो, बाळासाहेब ठाकरे यांनीच सर्वप्रथम अस्तित्वात आणला होता. राजकारणाच्या या सत्ताकारणाचे स्वरूप पाहता बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यामधली मैत्री दीर्घकाळ नव्हे तर ती कायम टिकली आणि राहिली. या मैत्रीचे टिकण्याचे रहस्यच यामध्ये आहे की महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यातील सत्ताकारण हे वरच्या जात वर्गाभोवती केंद्रित ठेवणे हे या मैत्रीचे खरे रहस्य होते. त्यामुळे राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जातीपातीचे राजकारण एक  मध्ये सुरू झाल्याचे जे विधान केले आहे, ते त्यांच्या राजकीय इतिहासाच्या विषयी असलेल्या  अज्ञानाचे प्रतीक आहे!

COMMENTS