मल्हारपेठ, ता. पाटण येथील पोलीस ठाणे व पोलीस निवासस्थानाचा ई-भूमिपूजन समारंभ राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व गृहमंत्री ना.
पाटण / प्रतिनिधी : मल्हारपेठ, ता. पाटण येथील पोलीस ठाणे व पोलीस निवासस्थानाचा ई-भूमिपूजन समारंभ राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व गृहमंत्री ना. दिलीपराव वळसे-पाटील, सहकारमंत्री तथा पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री (शहरे) ना. सतेज पाटील या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवार, दि. 24 जून रोजी दुपारी 12.30 वा. होणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी दिली.
मल्हारपेठ, ता. पाटण हे गाव पाटण तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असणारे मुख्य बाजारपेठेचे गाव असून सन 1995 युती शासनाच्या काळात तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी मल्हारपेठ दूरक्षेत्राचे स्वतंत्र पोलीस ठाण्यामध्ये रुपांतर करणेकरीता विद्यमान आमदार व सध्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी युती शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. पाटण तालुक्याची भौगोलिक परिस्थिती व मल्हारपेठ येथील मोठी बाजारपेठ, वाढते गुन्हे तसेच कराड ते चिपळूण या राज्यमार्गाचे एनएच 199 ई असे महामार्गाचे नव्याने वर्गीकरण झाल्याने वाढत्या रस्ते अपघातांचा विचार करता तसेच कायदा व सुव्यवस्था राखणेकरीता स्वतंत्र पोलीस ठाणेची निर्मिती व्हावी, अशी ना. देसाई यांनी मागणी केली होती.
मल्हारपेठ, ता. पाटण पोलीस ठाण्याच्या व पोलीस कर्मचारी निवासस्थानाच्या कामास ना. शंभूराज देसाई हे राज्याचे गृहराज्यमंत्री झालेनंतर मुर्त स्वरुप प्राप्त झाले. दोन्ही कामांसाठी 19.24 कोटी इतक्या रक्कमेच्या खर्चाची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण व उंब्रज पोलीस ठाण्याचे विभाजन करुन पाटण पोलीस ठाणेमधील मल्हापेठ व बेलवडे दूरक्षेत्र आणि उंब्रज पोलीस ठाणेमधील चाफळ दूरक्षेत्र एकत्रीकरण करुन मल्हारपेठ पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. मल्हारपेठ पोलीस ठाणे अंतर्गत अनुक्रमे मल्हारपेठ दूरक्षेत्र 30 गावे, चाफळ दूरक्षेत्र 23 गावे, बेलवडे दूरक्षेत्र 17 गावे अशी एकूण 70 गावे या पोलीस ठाण्यात समाविष्ठ करण्यात आली आहेत. मल्हारपेठ पोलीस ठाणे इमारत व प्रकार 2 व 3 ची निवासस्थाने उभारण्यात येणार आहेत. यामध्ये पोलीस ठाणे इमारत 918.65 चौरस मीटर तर 56 निवासस्थाने 4412.45 चौ. मी. आकार 3 निवासस्थानामध्ये 4 निवासस्थाने 366.18 चौ. मी. क्षेत्रफळाचे बांधकाम करण्यात येणार आहे. मल्हारपेठ पोलीस ठाणेसाठी 1 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 1 पोलीस उपनिरीक्षक, 3 सहाय्यक फौजदार, 4 पोलीस हवालदार, 7 पोलीस नाईक, 14 पोलीस शिपाई असे एकूण 30 पोलिसांचे संख्याबळ देण्यात आले आहे.
COMMENTS