मनोरुग्ण महिलांना दिलासा नगरला स्वतंत्र कोविड सेंटर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनोरुग्ण महिलांना दिलासा नगरला स्वतंत्र कोविड सेंटर

मनोविकलांगतेमुळे मास्क लावणे वा स्वच्छता पाळण्यासारख्या नियमांबाबत अनभिज्ञ असलेल्या महिलांसाठी येथील माऊली सेवा प्रतिष्ठानने दिलासा दिला आहे.

जोखमीचे काम करणारे सर्पमित्र प्रशिक्षण व सुविधांपासून वंचितच | आपलं नगर | LokNews24 |
कर्मवीर काळे विद्यालयाचा दहावीचा निकाल 95.6 टक्के
लॉकडाऊन उपाय नाही”: प्रकाश आंबेडकर |

अहमदनगर/प्रतिनिधी-मनोविकलांगतेमुळे मास्क लावणे वा स्वच्छता पाळण्यासारख्या नियमांबाबत अनभिज्ञ असलेल्या महिलांसाठी येथील माऊली सेवा प्रतिष्ठानने दिलासा दिला आहे. प्रतिष्ठानच्यावतीने  अनाथ, बेघर, मनोरुग्ण व गंभीर आजारी महिलांसाठी राज्यातले पहिले माऊली मिशन कोव्हीड केअर व विलगीकरण केंद्र नगर-मनमाड महामार्गावरील नगर तालुक्यातील शिंगवे नाईक येथील मनगावमध्ये सुरू करण्यात आले आहे. 

    करोनाच्या कठीण काळात समाजातील कित्येकांना पैसे असूनही करोनासाठीचे उपचार, ऑक्सिजन आदी मिळत नाहीत. या काळात रस्त्यावर बेघर, बेवारस जगणार्‍या अनेक मानसिक आणि शारीरिक आजारी व्यक्तींना प्राथमिक उपचार मिळत नाही. तेथे त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या दुखण्याखुपण्याची चौकशी कोण करणार?, असा प्रश्‍नच आहे. अनेकदा या व्यक्तींनाही करोनाची लागण झालेली असते, परंतु त्याची कुठे तपासणी किंवा नोंद होत नाही. या पार्श्‍वभूमीवर माऊली सेवा प्रतिष्ठानचे डॉ. सुचेता व डॉ. राजेंद्र धामणे या दाम्पत्याने अशा महिलांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या काळात व यापुढेही करोनाच्या पार्शवभूमीवर मनोविकलांग महिलांना सध्याच्या माऊली सेवा प्रतिष्ठानच्या वाय. एस. साने इंद्रधनू प्रकल्प व मनगाव या प्रकल्पात पूर्वीप्रमाणे दाखल करून घेता येत नाही. कारण, कदाचित येणारी महिला जर कोव्हीड पॉझिटिव्ह असेल तर सध्याच्या दाखल महिलाही तिच्यामुळे बाधित होऊ शकतील. त्यामुळे आधी त्यांचे विलगीकरण करून त्यांची कोव्हीड व इतर वैद्यकीय तपासणी करून व चौदा दिवस विलगीकरणात ठेवूनच त्यांना मुख्य प्रकल्पात आयुष्यभरासाठी दाखल करून घेता येणार असल्याने अशा महिलांसाठी विलगीकरण व कोव्हीड पॉझिटिव्ह असल्यास करोना केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. माऊलीच्या माऊली मिशन प्रकल्पांतर्गत शिंगवे येथे ही 20 खाटांची नवीन सुविधा निर्माण करण्यात आली असून येथे सर्व वैद्यकीय उपचारांसोबत ऑक्सिजन काँन्सट्रेटर व दोन आयसीयु बेडची सुविधा करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात हे सेंटर फक्त रस्त्यावरील अनाथ महिला व त्यांच्या मुलांसाठी असेल तर पुढच्या टप्य्यात पुरुषांसाठीही ते सुरु करण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. धामणे दाम्पत्याने सांगितले.

मनोविकलांग महिलांचा आधार

माऊली सेवा प्रतिष्ठानद्वारे मनोविकलांग महिलांना आधार देण्याचे काम मागील 15-20 वर्षांपासून सुरू आहे. सध्या माऊलीच्या प्रकल्पात एकूण 350 महिला व त्यांची येथेच जन्मलेली 30 मुले कायमस्वरूपी राहत असून अजून 150 बेड क्षमतेचा नवीन विभागही येथे उपलब्ध आहे. त्यामुळे रस्त्यावर मनोविकलांग स्थितीत फिरणार्‍या महिला आढळल्यास त्यांना माऊलीच्या माउली मिशन प्रकल्पात दाखल करावे किंवा त्याची माहिती डॉ .राजेंद्र धामणे 9860847954 वा डॉ.सुचेता धामणे 9326107141 यांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS