नगर - प्रतिनिधी आता डिजिटल शिक्षणाचे युग सुरु झाले आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही या नवीन शिक्षण पद्धतीचा स्विकार करणे अनिवार्य आहे.
नगर – प्रतिनिधी
आता डिजिटल शिक्षणाचे युग सुरु झाले आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही या नवीन शिक्षण पद्धतीचा स्विकार करणे अनिवार्य आहे. अशा परिस्थितीत मनपा शाळेतील विद्यार्थ्यांही डिजिटल शिक्षणात मागे राहू नये यासाठी मनपाच्यावतीनेही डिजिटल शिक्षणास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून मनपा शाळेतील शिक्षकांसाठी डिजिटल स्कूल कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनाही आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात येणार आहे. त्यासाठी मनपाच्यावतीने तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन डिजिटल शाळांसाठी सर्वोतोपरि सहकार्य करु,असे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.
अहमदनगर महानगरपालिका शाळेतील शिक्षकांसाठी महानगरपालिकेच्यावतीने डिजिटल शाळा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, माजी नगरसेवक संजय चोपडा, नगरसेवक अमोल येवले, अतिरिक्त आयुक्त डॉ.प्रदिप पठारे, उपायुक्त श्रीनिवास कुर्हे, सहाय्यक आयुक्त सचिन राऊत, डिजिटल शाळेचे प्रणेते संदिप गुंड, टेक्नोसेल कंपनीचे संचालक संदिप पाटील, राजेश पाटील, मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी सुभाष पवार, पर्यवेक्षक जुबेर पठाण आदि उपस्थित होते.
डिजिटल शाळेचे प्रणेते संदिप गुंड यांनी महानगरपालिका शाळेतील शिक्षकांना तंत्रज्ञानाचा शिक्षणात वापर या विषयावर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.
याप्रसंगी संभाजी कदम म्हणाले, महानगरपालिकेच्या शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण देण्यासाठी महानगरपालिकेकडून शिक्षकांना सर्व प्रकारची मदत केली जाईल. महानगरपालिका शाळेतील शिक्षकांनी आपल्या अध्यापनात जर जास्तीत जास्त प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर केला तर मनपाच्या शाळांमधील पटसंख्या निश्चितच वाढेल. यापुढील काळात महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी व शिक्षक मिळून मनपा शाळा जास्तीत जास्त अत्याधुनिक करण्यासाठी प्रयत्न करू,असे श्री.कदम म्हणाले.
महानगरपालिकेच्या शाळांमधील शिक्षक तळमळीने ज्ञानदानाचे कार्य करत आहेत.यापुढील काळातही शिक्षक निश्चितच उत्तमोत्तम काम करतील, असे नगरसेवक अमोल येवले म्हणाले.
महानगरपालिका शाळांमध्ये राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांची माहिती प्रशासनाधिकारी सुभाष पवार यांनी आपल्या प्रास्ताविकातून उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण पवार व भाऊसाहेब कबाडी यांनी केले. तर पर्यवेक्षक जुबेर पठाण यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी सर्व मनपा शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच विशेष शिक्षक उपस्थित होते.
COMMENTS