मंत्री छगन भुजबळ गोपीनाथ गडावर; स्व. गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिस्थळी घेतले दर्शन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंत्री छगन भुजबळ गोपीनाथ गडावर; स्व. गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिस्थळी घेतले दर्शन

नाशिक : आज विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने बीड जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी परळी तालुक्यातील पांगरी येथे

कान चित्रपट महोत्सवात भारत पर्व ठरला सोहळ्याचे आकर्षण
राज ठाकरे म्हणजे भाजपचे अर्धवटराव l LOK News 24
Solapur : भीषण अपघात; तीन जणांचा जागीच मृत्यू | LOKNews24

नाशिक : आज विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने बीड जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी परळी तालुक्यातील पांगरी येथे जाऊन गोपीनाथ गडावर स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या स्मृतिस्थळी दर्शन घेतले.बीड येथे कृतज्ञता मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी भुजबळ हे नांदेड वरून परळी मार्गे बीड कडे जात असताना, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या वतीने यावेळी परळीत ठिकठिकाणी व पांगरी (गोपीनाथगड) येथे भुजबळ यांचे फटाके,हार,फेटा,ढोल, ताशाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. ना. छगन भुजबळ हे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर प्रथमच परळी तालुक्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी नगर परिषदेतील गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्यासह सहकाऱ्यांनी ना. भुजबळ यांचे जंगी स्वागत केले.

COMMENTS