अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार शहराची ओळख असणारी ऐतिहासिक वेस पूर्ण बांधणीच्या मागणीसाठी छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांना निवेदन देताना राष्ट्रवादी शहर संघटक मतीन सय्यद समवेत भारतीय जनता पक्षाचे प्रकाश लुनिया, काँग्रेस आयचे शाम वाघस्कर, आरपीआयचे युवक अध्यक्ष अमित काळे, सामाजिक कार्यकर्ते सचिन फिरोदिया आदी उपस्थित होते. भिंगार शहर मधील ऐतिहासिक बांधकाम असलेली भिंगार वेसचा काही भाग जिर्न झाला होता त्यामुळे वेसची दुरुस्ती करण्यात आली नव्हती त्यामुळे धोका दायक म्हणुन संपूर्ण वेस जमीनउद्ध्वस्त करण्यात आली होती व ती वेस आतापर्यंत छावणी परिषदेच्या वतीने बांधण्यात आलेली नाही भिंगार शहराची मुख्य प्रतीक असलेले सदर वास्तू आपण त्या जागेवर त्याची लांबी, रुंदी, उंची प्रमाणे दगडी बांधकाम करून बांधण्यात यावी त्यासाठी निष्णात वास्तु शास्त्र कडून पक्का आराखडा तयार करून लवकरात लवकर भिंगारची ओळख असणारी भिंगार वेस उभारावी त्यामुळे भिंगारच्या वैभवात पुन्हा भर पडेल व वेशी जवळ पौराणिक मारुती मंदिर आहे त्यामुळे सदर वास्तूचे अतिशय महत्त्व आहे. सदर वेशीचा आराखडा तयार होण्याच्या कालावधी अगोदर सदर वेशीच्या जागेवर त्याची लांबी रुंदीची लोखंडी प्रतीकात्मक वेस त्वरित नवरात्रीच्या घटस्थापनेच्या अगोदर 5 ऑक्टोंबर पर्यंत लावावी व वेस वर भुंगऋषी प्रवेश द्वार म्हणून नाव टाकण्यात यावे अन्यथा नागरिकांच्या वतीने छावनी परिषदेच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
अहमदनगर (प्रतिनिधी)-
भिंगार शहराची ओळख असणारी ऐतिहासिक वेस पूर्ण बांधणीच्या मागणीसाठी छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांना निवेदन देताना राष्ट्रवादी शहर संघटक मतीन सय्यद समवेत भारतीय जनता पक्षाचे प्रकाश लुनिया, काँग्रेस आयचे शाम वाघस्कर, आरपीआयचे युवक अध्यक्ष अमित काळे, सामाजिक कार्यकर्ते सचिन फिरोदिया आदी उपस्थित होते.
भिंगार शहर मधील ऐतिहासिक बांधकाम असलेली भिंगार वेसचा काही भाग जिर्न झाला होता त्यामुळे वेसची दुरुस्ती करण्यात आली नव्हती त्यामुळे धोका दायक म्हणुन संपूर्ण वेस जमीनउद्ध्वस्त करण्यात आली होती व ती वेस आतापर्यंत छावणी परिषदेच्या वतीने बांधण्यात आलेली नाही भिंगार शहराची मुख्य प्रतीक असलेले सदर वास्तू आपण त्या जागेवर त्याची लांबी, रुंदी, उंची प्रमाणे दगडी बांधकाम करून बांधण्यात यावी त्यासाठी निष्णात वास्तु शास्त्र कडून पक्का आराखडा तयार करून लवकरात लवकर भिंगारची ओळख असणारी भिंगार वेस उभारावी त्यामुळे भिंगारच्या वैभवात पुन्हा भर पडेल व वेशी जवळ पौराणिक मारुती मंदिर आहे त्यामुळे सदर वास्तूचे अतिशय महत्त्व आहे.
सदर वेशीचा आराखडा तयार होण्याच्या कालावधी अगोदर सदर वेशीच्या जागेवर त्याची लांबी रुंदीची लोखंडी प्रतीकात्मक वेस त्वरित नवरात्रीच्या घटस्थापनेच्या अगोदर 5 ऑक्टोंबर पर्यंत लावावी व वेस वर भुंगऋषी प्रवेश द्वार म्हणून नाव टाकण्यात यावे अन्यथा नागरिकांच्या वतीने छावनी परिषदेच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
COMMENTS