भिंगार अर्बन बँकेला यंदा 6 कोटीचा नफा ; 300 कोटी ठेवींचे उद्दिष्ट गाठण्याचा विश्‍वास व्यक्त

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भिंगार अर्बन बँकेला यंदा 6 कोटीचा नफा ; 300 कोटी ठेवींचे उद्दिष्ट गाठण्याचा विश्‍वास व्यक्त

भिंगार येथे मागील शतकाहून अधिक काळापासून समाजिभिमुख कामकाज करुन तसेच शहर वासियांची बँकिंग सेवा करीत असलेल्या भिंगार अर्बन बँकेला मागील आर्थिक वर्षात 6 कोटी रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे.

झाडावरच्या बोरांच्या आमीषाने मुलाला गमवावा लागला प्राण…
दुधाचा टॅंकर पलटी, हजारो लिटर दुधाची नासाडी
राहुरीतील व्यापार्‍याला 23 लाख रूपयांना घातला गंडा

अहमदनगर/प्रतिनिधी- भिंगार येथे मागील शतकाहून अधिक काळापासून समाजिभिमुख कामकाज करुन तसेच शहर वासियांची बँकिंग सेवा करीत असलेल्या भिंगार अर्बन बँकेला मागील आर्थिक वर्षात 6 कोटी रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे. बँकेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन केले असल्याने बँकेला सतत ‘अ’वर्ग मिळत असून, रिझर्व्ह बँकेने ‘ए’ग्रेड दिली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अनिल झोडगे यांनी दिली. आधुनिक बॅकिंग सेवेबरोबरच सर्व खातेदार, कर्जदारांशी असलेल्या सौहार्दपूर्ण कामकाजामुळे बँक सातत्याने प्रगती करत आहे. लवकरच ठेवींचा 300 कोटींचा टप्पा बँक पार करणार आहे. सध्या 150 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. खातेदारांचा बँकेवरील विश्‍वास संचालक मंडळाचे विश्‍वासपूर्ण काम व कर्मचार्‍यांचे असलेले सहकार्य यामुळेच बँकेची सातत्याने प्रगती होत असल्याचे त्यांनी वार्षिक सभेत सांगितले. 

याप्रसंगी उपाध्यक्ष किसनराव चौधरी म्हणाले, बँकेचे माजी चेअरमन (स्व.) गोपाळराव झोडगे यांच्या निधनानंतर सप्टेंबर 2020 पासून बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा अनिल झोडगे यांनी उत्कृष्टपणे सांभाळली आहे. या दरम्यान त्यांनी सर्वांशी मिळून मिसळून बँक प्रगतीपथावर कशी राहील, यासाठी सर्व संचालकांच्या मदतीने प्रयत्न केले आहेत. बँकिंग व्यवसायाबरोबरच सामाजिक जाणीवेतून सभासदांच्या हुशार मुलांना प्रोत्साहन देणे, खेळास प्रोत्साहन देणे, आरोग्य शिबिरांचे आयोजन करणे, वृक्षारोपण असे समाजाभिमुख उपक्रम राबविल्यामुळेही बँकेची सर्वांगीण प्रगती होत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पांडुरंग हजारे यांनी सांगितले. यावेळी संचालक मंडळ सदस्य रमेश परभणे, नाथा राऊत, राजेंद्र पतके, कैलास खरपुडे, संदेश झोडगे, विजय भंडारी, विष्णू फुलसौंदर, अमोल धाडगे, एकनाथ जाधव, श्रीमती तिलोतमाबाई करांडे, श्रीमती कांताबाई फुलसौंदर, नामदेव लंगोटे, रामसुख मंत्री, राजेंद्र बोरा आदी उपस्थित होते.

COMMENTS