यवतमाळ : शिवसेनेच्या तब्बल पाच वेळेला लोकसभेच्या खासदार असणार्या भावना गवळी यांच्या 5 शैक्षणिक संस्थावर सोमवारी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने छा
यवतमाळ : शिवसेनेच्या तब्बल पाच वेळेला लोकसभेच्या खासदार असणार्या भावना गवळी यांच्या 5 शैक्षणिक संस्थावर सोमवारी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने छापेमारी केल्यानंतर एकच खळबळ उडाली. ईडीने येथील संस्थातून कागदपत्रे ताब्यात घेतली असून, त्याची पडताळणी करण्यात येत आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 20 ऑगस्ट रोजी वाशिममध्ये पत्रकार परिषदेत घेत खासदार भावना गवळी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर ईडीचे पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. पाचही शिक्षण संस्थांच्या अधिकार्यांनी ईडीकडून चौकशी सुरु आहे. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी वाशिमचा दौरा केला होता. वाशिमच्या देगाव, शिरपूर आणि इतर तीन ठिकाणी या पाच संस्था आहेत. मागील वर्षी 5 कोटी चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले होते.
2006 चे प्रकरण बालाजी पार्टीकल बोर्ड सहकारी संस्था म्हणून उभे करण्यात आले होते. गवळींच्या निकटवर्तीयांनी हे खरेदी केल्याचा दावा करण्यात आला होता. 2011 मध्ये मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. यात मोठा गैरव्यवहार झाला असा आरोप करण्यात आलेला. दुसरीकडे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी खासदार भावना गवळी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची टीम लूटमार करत आहे. भावना गवळीच्या टीमने 100 कोटींची लूट नाही, तर माफियागिरी चालवली आहे. 18 कोटी रुपये रोख भावना गवळी यांनी विविध संस्थांमधून काढले आहेत आणि 7 कोटींची चोरी झाल्याचे असे प्रकार आहे. केंद्र सरकारचे 44 कोटी, स्टेट बँकेचे 11 कोटी रुपये यांनी बालाजी कारखाना बनवला 55 कोटींमध्ये. आणि स्वत:च्या भावना एग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने फक्त 25 लाख रुपये देऊन काबीज केला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
काय आहेत आरोप ?
भावन गवळींनी आपल्या बालाजी आर्टीकल फोर्ट कारखान्यासाठी 44 कोटी रुपये भारत सरकारच्या बँकेचे कर्ज घेतले. 11 कोटी रुपये कर्ज स्टेट बँकांकडून घेतले. विशेष म्हणजे हा 55 कोटी रुपयांचा कारखाना आपल्याच बेनामी कंपनी असलेल्या भावना अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेडला केवळ 25 लाख रुपयांत विकला. त्यानंतर, नवीन बेनामी कंपनीवर आखणी 11 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले. अशाप्रकारे भावना गवळींनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहेत.
भाजप आमदारावर ईडी लावणार का? : गवळी
ईडीच्या छापेमारीनंतर खासदार भावना गवळी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. मला ईडीचे कोणतीही नोटीस आलेली नाही. संस्थांवर ईडीचे अधिकारी आले आहेत. ते चौकशी करत आहेत. आणीबाणीसारखी वागणूक दिली जात आहेत. सर्वच शिवसेनेच्या मंत्री, नेत्यांना टार्गेट केलं जात आहे. माझ्या संस्थेचा एफआयर मी स्वत: नोंदवला होता. मला तो हिशोब मिळाला नाही म्हणून मी तक्रार दाखल केली असल्याचे गवळी यांनी स्पष्ट केले. भाजपचे एक आमदार या भागातील आहेत. ते भूमाफिया आहेत. त्यांनीही 500 कोटींचा घोटाळा केला आहे. केंद्र सरकार त्यांचीही ईडी चौकशी लावणार का? असा सवाल ही त्यांनी यावेळी केला.
COMMENTS