Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या घरावरील हल्ल्यात पोलिस हुतात्मा

जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथे गुरुवारी सकाळी एक दहशतवादी हल्ला झाला. श्रीनगरमध्ये असलेल्या नौगाम परिसरात भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या घरावर हा हल्ला झाला.

मोबाइल हिसकावणारे चोरटे अटकेत
हिमाचलमधील मशिदीचे 2 मजले पाडण्याचे आदेश
महापुरूषांच्या अवमानाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा  

श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथे गुरुवारी सकाळी एक दहशतवादी हल्ला झाला. श्रीनगरमध्ये असलेल्या नौगाम परिसरात भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या घरावर हा हल्ला झाला. दहशदवाद्यांनी हल्ल्यानंतर पळून जाताना सुरक्षारक्षकाची रायफलही पळवून नेली असून, या हल्ल्यात पोलिस कर्मचाऱ्याला हौतात्म्य आले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नौगामच्या अरीबागमध्ये राहणारे भाजप नेते अनवर खान यांच्या घरावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी गोळीबार करत खान यांच्या घरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे एकच गोंधळ उडाला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात घराबाहेरील गार्ड पोस्टवरील पोलिस कर्मचारी रमीज राजा गंभीर जखमी झाले,  असे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

COMMENTS