पावसाळा म्हटलं की बरेच कीडे, कीटक आणि इतर जीव दिसू लागतात. घराबाहेरच नव्हे तर घरातही असे जीव दिसतात. त्यामुळे बूट, कपडे यामध्ये असे छोटे-मोठे जीव असण
पावसाळा म्हटलं की बरेच कीडे, कीटक आणि इतर जीव दिसू लागतात. घराबाहेरच नव्हे तर घरातही असे जीव दिसतात. त्यामुळे बूट, कपडे यामध्ये असे छोटे-मोठे जीव असण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे आपणही पावसात कपडे, बूट तपासून घेतो, नीट झाडून घालतो . पण कधी यामध्ये सापही असू शकतो, याचा स्वप्नात तरी तुम्ही विचार केला असेल का? असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एका बुटामध्ये कोब्रा(Cobra) सारखा खतरनाक साप लपून बसला होता. एका घरात शूरॅकवर बऱ्याच चपला ठेवण्यात आल्या आहेत. त्यापैकी एका बुटामध्ये एक महिला काठी टाकताना दिसते आहे. ती बुटामध्ये काठी टाकून हलवते आणि बऱ्याच वेळाने त्या शूझमधून एक भलामोठा साप बाहेर येतो. हा साधासुधा साप नव्हे तर विषारी खतरनाक कोब्रा साप आहे. जो बाहेर येताच आपला फणा काढून उभा राहतो . अंगावर थरकाप उडवणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
COMMENTS