अहमदनगर/प्रतिनिधी : बनावट रहिवासी दाखला तयार करुन त्याआधारे लष्करात भरती झालेल्या उत्तरप्रदेश येथील जवानावर भिंगारच्या कॅम्प पोलिस ठाण्यात फसवणुकीचा
अहमदनगर/प्रतिनिधी : बनावट रहिवासी दाखला तयार करुन त्याआधारे लष्करात भरती झालेल्या उत्तरप्रदेश येथील जवानावर भिंगारच्या कॅम्प पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन ओमपाल (वय 19, रा.बाडी, ता. सिदौली, जि. सीतापूर, उत्तर प्रदेश) असे या गुन्हा दाखल झालेल्या जवानाचे नाव आहे. यासंदर्भात लष्कराच्या बीएमआर रेजिमेंटचे अधिकारी साई स्वरुप जेना (वय 45) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी असलेला जवान सचिन ओमपाल हा मागील वर्षी ऑक्टोबर 2020 मध्ये उत्तर प्रदेश येथे सैन्यदलात भरती झाला होता. त्याची प्रारंभी बरेली (उत्तरप्रदेश) व नंतर नगरच्या डीएमआर रेजिमेंटमध्ये नियुक्ती झाली होती. लष्करात भरती होत असताना तो बाडी (ता. सिदौली) या गावचा रहिवासी असल्याचे सांगून त्याने बनावट कागदपत्रे दिली होती. मात्र, लष्कराने केलेल्या तपासणीत तो बाडी गावचा रहिवासी नसून त्याने बनावट रहिवासी दाखला सादर केल्याचे निष्पन्न झाले. खोट्या कागदपत्रांच्या आधारे सैन्यदलात भरती होऊन सैन्य दलाची फसवणूक केल्यामुळे त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याबाबतची फिर्याद लष्कराच्यावतीने देण्यात आली. या फिर्यादीवरुन भिंगार कॅम्प पोलिसांनी आरोपी सतीश ओमपाल याच्याविरुद्ध भा.दं.वि.क. 420, 177 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
COMMENTS