Homeताज्या बातम्यादेश

बंगालमध्ये दुर्गा विसर्जनावेळी बॉम्ब हल्ला; अनेकजण जखमी

बंगाल / पश्‍चिम बंगालच्या दुर्गापूर इथं शनिवारी रात्री दुर्गा विसर्जनासाठी गेलेल्या भाविकांवर बॉम्ब फेकण्यात आल्याची घटना घडली आहे. देशी बॉम्ब फेकल्य

महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी महाविकास आघाडीस ताकद द्या : आ. जयंत पाटील
श्री अंबाबाई मंदिरात चोरी करताना दोन महिलांना रंगेहात पकडले
श्री सिध्दनाथ-देवी जोगेश्‍वरी शाही विवाह सोहळ्यास प्रारंभ

बंगाल / पश्‍चिम बंगालच्या दुर्गापूर इथं शनिवारी रात्री दुर्गा विसर्जनासाठी गेलेल्या भाविकांवर बॉम्ब फेकण्यात आल्याची घटना घडली आहे. देशी बॉम्ब फेकल्यानंतर मोठा आवाज झाल्याने लोकांमध्ये गोंधळ उडाला. काहींनी यावेळी हल्ला करत गाड्यांची तोडफोड केली. दुर्गापुरच्या अन्नपूर्णा भागात दुर्गा विसर्जनावेळी हा प्रकार घडला असून पोलिस याचा अधिक तपास करत आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दुर्गापूरच्या अन्नपूर्णा भागात शनिवारी रात्री दुर्गा विसर्जन करून काही लोक परत निघाले होते. यावेळी काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. दोन्ही गटात दारुवरून आधी भांडण झालं होतं अशीही माहिती समजते. जेव्हा एक गट मूर्ती विसर्जन करून परत येत होता तेव्हा दुसर्‍या गटाने त्यांना रस्त्यात अडवलं आणि दारुसाठी पैसे मागितले. यावरून दोन्ही गटांमध्ये भाडंण झालं आणि त्यातच मारहाणही करण्यात आली. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

COMMENTS