फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांना मुंबई पोलिसांचे समन्स

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांना मुंबई पोलिसांचे समन्स

फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई पोलिसांनी वरीष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना समन्स बजावले आहे. त्यात त्यांनी तपासामध्ये सहकार्य करावे आणि बुधवारी चौकशीसाठी उपस्थित रहावे, असे नमूद करण्यात आले आहे. 

नवदाम्पत्याने विष प्राशन करून आत्महत्या
निंबोडीजवळ गाडीची झाडाला धडक
सिंचन प्रकल्प रखडले, कॅगचे ताशेरे

मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई पोलिसांनी वरीष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना समन्स बजावले आहे. त्यात त्यांनी तपासामध्ये सहकार्य करावे आणि बुधवारी चौकशीसाठी उपस्थित रहावे, असे नमूद करण्यात आले आहे. 

 विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महिन्याभरापूर्वी पोलीस बदल्यांमधील घोटाळ्यांबद्दल केलेल्या आरोपांमध्ये वरीष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंगचा उल्लेख केला होता. याच संदर्भात शुक्ला यांना मुंबई पोलिसांनी समन्स पाठवले आहे. २०१९ च्या फोन टॅपिंग प्रकरणामध्ये मुंबईतील सायबर पोलीस स्थानकामध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआर संदर्भात हे समन्स बजावण्यात आले आहे. हे फोन टॅपिंग प्रकरण घडलं तेव्हा शुक्ला या गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या.

COMMENTS