लोणी दि.३ प्रतिनिधीलोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या
लोणी दि.३ प्रतिनिधी
लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ऋतुजा दिघे या विद्यार्थिनीची क्रेडीट सुईस्से या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये बारा ) लाखांच्या पगारावर तर मोनाली जोंधळे हिची ८.९ लाखांच्या पगारावर जॉन डियर प्रा. लिमिटेड या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड झाली आहे व प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील प्लेसमेंटचा आकडा 198 हून अधिक झाला आहे असून अनेक विद्यार्थी निवड प्रक्रियेत शॉर्टलिस्ट झाले आहे अशी माहिती प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी दिली. त्यांनी यावेळी नमूद केले कि महाविद्यालयाच्या विद्यार्थांची उत्र्कृष्ट पगारावर नोकरी साठी निवड होत आहे.
या वेळी खासकरून पद्मभूषण लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या विद्यार्थांचा श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
ह्या विद्यार्थांनी या यशाचे श्रेय प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी होत असणाऱ्या उपक्रमाना व प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाला दिले.
या विद्यार्थ्यांना मिळालेल्या या यशाबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंञी आ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के ,जिल्हा परीषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खा. डाॅ.सुजय विखे पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ , सहसचिव श्री. भारत घोगरे पाटील, शिक्षण संचालक विजय आहेर,प्रवरा इंजिनीरिंगचे प्राचार्य. डॉ. संजय गुल्हाने, ट्रेनिंग प्लेसमेंटचे समन्वयक प्रा. मनोज परजणे, डॉ. अण्णासाहेब वराडे, डॉ. सचिन कोरडे, प्रा. दिपक साळुंके,पंकज चित्ते सर्व विभागप्रमुख, विद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन केले.
COMMENTS