पोलीस ठाण्यात विष पिऊन युवकाची आत्महत्या…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलीस ठाण्यात विष पिऊन युवकाची आत्महत्या…

अहमदनगर/प्रतिनिधी : माझ्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केल्याने मी आत्महत्या करीत आहे, अशी फेसबुकवर अखेरची पोस्ट टाकत राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथ

गोदावरी कालव्यांना ओव्हर फ्लोचे पाणी द्या
कारखान्यांनी ग्रीन हायड्रोजन निर्मितीसाठी पुढे यावे ः गडकरी
संजीवनीचा व्हॉलीबॉल संघ विभागीय पातळीवर प्रथम

अहमदनगर/प्रतिनिधी : माझ्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केल्याने मी आत्महत्या करीत आहे, अशी फेसबुकवर अखेरची पोस्ट टाकत राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील अनिल प्रभाकर उदावंत (वय.42) याने लोणी पोलिस ठाण्यात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्यावर त्याला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी लोणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
याबाबतची माहिती अशी की, अनिल उदावंत याने लोणी पोलीस ठाण्यात विष प्राशन करण्यासाठी जाण्यापूर्वी त्याने फेसबुकवर अखेरची पोस्ट टाकत, माझ्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केल्याने मी आत्महत्या करीत असून, माझ्या मृत्यूला शेतकरी आत्महत्या समजू नये, असा मजकूर टाकला. त्यानंतर त्याने लोणी पोलिस ठाण्यात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यास उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहितीनुसार अनिल उदावंत आणि त्याच्या नातेवाईकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. त्यांनी लोणी पोलीस ठाण्यात एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्याने पोलिसांनी गुन्हेही दाखल केलेले आहेत. त्याच्या आत्महत्येबद्दल माहिती देताना लोणी पोलिसांनी सांगितले की, त्याच्या हातात विषाची बाटली होती. तो विष पिऊन आलेला होता. परिस्थितीचे गांभीर्य बघून पोलिसांनी त्याला प्रवरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला. परंतु त्याचा बुधवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, लोणीत समाज माध्यमांवर अनिल उदावंत यांनी विष प्राशन करण्यापूर्वी फेसबुकवर टाकलेली एक पोस्ट फिरत आहे. मंगळवारी पोलीस ठाण्यात जाण्यापूर्वी अनिलने ही पोस्ट टाकल्याचे बोलले जाते. त्यात त्याने माझ्याविरुद्ध खोटे गुन्हे देणारे व दाखल करणारे माझ्या मृत्यूला जबाबदार आहेत. माझी आत्महत्या शेतकरी आत्महत्या समजू नये अशा आशयाचा मजकूर लिहिला आहे. या प्रकरणी लोणी पोलिसांनी अकस्मात गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस करीत आहे.

COMMENTS