पोलिसांनी जप्त केली 49 शस्त्रे आणि पकडले 130 जणांना ; मागील दहा महिन्यांची कामगिरी, 55 गुन्हेही दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिसांनी जप्त केली 49 शस्त्रे आणि पकडले 130 जणांना ; मागील दहा महिन्यांची कामगिरी, 55 गुन्हेही दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी-जिल्हा पोलिसांनी मागील 10 महिन्यात जिल्ह्यात 27 गावठी कट्टे व 22 तलवारी जप्त केल्या. याप्रकरणी 55 गुन्हे दाखल केले असून, 130जणांना

दैनिक लोकमंथन l नक्षलवादी हल्ल्यात 22 जवानांना हौतात्म्य
इंधन दरवाढीवरून केंद्र-राज्य संघर्ष
Ahmednagar मध्ये वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा… ‘या’ हॉटेलमध्ये सुरु होता कुंटणखाना | Sex Racket (Video)

अहमदनगर/प्रतिनिधी-जिल्हा पोलिसांनी मागील 10 महिन्यात जिल्ह्यात 27 गावठी कट्टे व 22 तलवारी जप्त केल्या. याप्रकरणी 55 गुन्हे दाखल केले असून, 130जणांना अटक केली आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील नगरला रुजू झाल्यापासून ही कामगिरी जिल्हा पोलिसांनी केली आहे. दरम्यान, मागील दोन दिवसात विशेष मोहिमेत 7 गावठी कट्टे, 8 जिवंत काड़तुसे व 3 तलवारींसह 14जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाळू तस्करीसह अन्य विविध गुन्ह्यांमध्ये सर्रास शस्त्रांचा वापर नगर जिल्ह्यात नेहमीचा झाला आहे. त्यामुळे राज्याच्या गुन्हेगारी आकडेवारीत नगर जिल्ह्याचा क्रमांक नेहमी वरचा असतो. या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधीक्षक पाटील हे मागील वर्षी 1 नोव्हेंबर 2020 रोजी जिल्ह्यात रुजू झाल्यानंतर आतापर्यंतच्या 10 महिन्यात पोलिसांनी 27 गावठी कट्टे हस्तगत केले असून, याप्रकरणी 36 गुन्हे दाखल केले आहेत व 106जणांना अटक केली आहे. तसेच 22 तलवारीही जप्त करण्यात आल्या असून, याप्रकरणी 19 गुन्हे दाखल करून 24जणांना अटक करण्यात आली आहे.

चारशेवरजणांचा फौजफाटा
श्रीरामपूर, नेवासे व राहुरी या तीन तालुक्यात जिल्हा पोलिसांनी नुकत्याच राबवलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये 82 ठिकाणी छापे टाकून 7 गावठी कट्टे, 8 जिवंत काडतुसे व 3 तलवारी हस्तगत केले आहे. या मोहिमेत अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व दीपाली काळे यांच्यासह पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके व उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्यासह पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार, रणजित डेरे, मसूद खान, विजय करे, संजय सानप, नंदकुमार दुधाळ,सोमनाथ दिवटे, रामचंद्र करपे, सचिन बागुल, गणेश इंगळे यांच्यासह जिल्ह्यातील 25 पोलिस उपनिरीक्षक व 350 पोलिस अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होते. पोलीस पथकाने दोन दिवस कोम्बिंग ऑपरेशन राबवून दहा हत्यारे हस्तगत केली. याप्रकरणी पोलिसांनी 14 जणांना अटक केली. जिल्ह्यातील या तीन तालुक्यांमध्ये या अगोदर विविध प्रकारचे गावठी कट्ट्याच्या संदर्भातील गुन्हे दाखल होते. त्यामुळे पहिल्या टप्प्यात या तीन तालुक्यांचा सर्च घेतलेला आहे. या पुढील काळात सुद्धा अशा प्रकारच्या कारवाया जिल्हाभरात सुरू ठेवणार असल्याचेही अधीक्षक पाटील यांनी यावेळी सांगितले. जे आरोपी पकडलेले आहेत. त्यांच्यावर याअगोदर अनेक गुन्हे दाखल आहेत तसेच यात पकडलेले काही आरोपी वाळूतस्करांशी निगडीत असावेत असा संशय आहे, असेही अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

आरोपींमध्ये 13 जण
सर्च ऑपरेशनमध्ये 14 आरोपी असले तरी एक अल्पवयीन आहे. राहिलेले 13 आरोपी असे- अशोक लष्करे (रा.नेवासा फाटा), रितेश साळवे (रा. नेवासा), शुभम गर्जे (रा. नेवासा), लक्ष्मण अडागळे (रा.गंगानगर, तालुका नेवासा), शाहरुख युनुस पटेल (रा. श्रीरामपूर), किरण धोत्रे (रा.बाजारतळ, श्रीरामपूर), अनिल इरले (रा.देवळाली प्रवरा, तालुका राहुरी), कैलास धोत्रे (रा. देवळाली प्रवरा, राहुरी), काशिनाथ शिंदे (रा. नगर), शाहरुख शेख (रा. घोडेगाव, तालुका नेवासा), सिद्धार्थ पठारे (रा.गंगापूर), कैलास राजू धोत्रे (रा.देवळाली प्रवरा), मयूर दीपक तावर (रा. श्रीरामपूर) यांच्यासह एका अल्पवयीन आरोपीचा यामध्ये समावेश आहे.

सातजणांविरुद्ध अन्य गुन्हे
पोलिसांनी सर्च ऑपरेशनमध्ये पकडलेल्या 14जणांपैकी 7जणांविरुद्ध विविध गुन्हे दाखल आहेत. अशोक लष्करेविरुद्ध नेवासे व शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात, रितेश साळवेविरुद्ध नेवासा पोलिसात, शुभम गर्जेविरोधात नेवासा पोलिस, लक्ष्मण अडागळेविरोधात नेवासा, शाहरूख पटेलविरोधात श्रीरामपूरला, काशिनाश शिंदेविरोधात नगरच्या तोफखाना व भिंगार पोलिसात तर शाहरूख शेखविरोधात सोनई व नगर एमआ़यडीसी पोलिस ठाण्यांतून गुन्हे दाखल आहेत. दरोडा, जबरी चोरी, मारामारी, खुनाचा प्रयत्न, अवैधरित्या शस्त्र बाळगणे, विनयभंग, चोरी, दरोड्याची तयारी करणे अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे या सर्वांविरुद्ध दाखल आहेत.

COMMENTS