पोटनिवडणुकीत भाजपने मारली बाजी ; विजयी प्रदीप परदेशींनी शिवसेनेच्या तिवारींना चारली धूळ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोटनिवडणुकीत भाजपने मारली बाजी ; विजयी प्रदीप परदेशींनी शिवसेनेच्या तिवारींना चारली धूळ

अहमदनगर/प्रतिनिधी : पहिल्या दोन फेर्‍यांमध्ये मनसे पुढे असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या, पण पुढच्या दोन फेर्‍यात शिवसेनेने आघाडी घेतल्याने शिवसैन

अहमदनगरमधील 87 हजारजणांना द्यायचाय दुसरा डोस
उपजिल्हा रुग्णालय व व्यापारी संकुल कामाची आमदार काळेंकडून पाहणी
शहरटाकळी विद्यालयामध्ये इको फ्रेंडली राख्या बनवा कार्यशाळेचा समारोप

अहमदनगर/प्रतिनिधी : पहिल्या दोन फेर्‍यांमध्ये मनसे पुढे असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या, पण पुढच्या दोन फेर्‍यात शिवसेनेने आघाडी घेतल्याने शिवसैनिकांचे चेहरे खुलले…पण शेवटच्या दोन फेर्‍यांनी कमाल केली व मागच्या चारही फेर्‍यांतील पिछाडी भरून काढीत भाजपच्या प्रदीप परदेशींनी अखेर बाजी मारली. मनपाच्या प्रभाग 9-क या पोटनिवडणुकीच्या निकालाची ही कथा. भाजपच्या परदेशींनी तब्बल 517 मतांनी विजय मिळवत महाविकास आघाडीचे म्हणजेच शिवसेनेचे उमेदवार सुरेश तिवारी यांना धूळ चारली. पहिल्या दोन फेर्‍यांमध्ये आघाडी घेणारे मनसेचे पोपट पाथरे यांची लढत मात्र लक्षवेधी ठरली.
प्रभाग 9-क या प्रभागाच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी (21 डिसेंबर) मतदान झाल्यानंतरच या निवडणुकीच्या निकालाच्या पैजा लागल्या होत्या. बुधवारी (22 डिसेंबर) सकाळी 9 वाजता मतमोजणी सुरू झाल्यावर फेरीनुसार बाहेर येणारा निकाल अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवत होता. सुरुवातीला मनसेचे पाथरे हे दोन फेर्‍यांतून पुढे होते व त्यानंतरच्या दोन फेर्‍यांमध्ये शिवसेनेच्या तिवारींनी आघाडी घेतली. पण शेवटच्या दोन फेर्‍यांमध्ये भाजपच्या परदेशींनी बाजी पलटवत प्रत्येकी साडेचारशे मतांची आघाडी घेत निकालच ़िफरवून टाकला व विजयश्रीची माळ आपल्याकडे खेचून आणली. पहिल्या चारही फेर्‍यात पिछाडीवर पडल्याने परदेशींच्या समर्थकांमध्ये निराशा पसरली होती. पण शेवटच्या दोन फेर्‍यांतून कमाल झाली व त्यांचे चेहरे खुलले आणि मनसे व शिवसेना समर्थकांचे चेहरे पडले.

छिंदमच्या जागी भाजपचा झेंडा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानजनक शब्द उच्चारणारा या प्रभागातील 9-क या जागेचा अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम याचे नगरसेवकपद रद्द झाल्याने त्याच्या रिक्त जागी पोटनिवडणूक घेण्यात आली. तिच्या निकालाने छिंदमच्या जागेवर भाजपने झेंडा फडकावला. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी यांना धूळ चारण्यात भाजप यशस्वी झाला. भाजपचे प्रदीप परदेशी यांनी 517 मतांनी विजय संपादन केला. महाविकास आघाडीचे सुरेश तिवारी (शिवसेना) यांचा पराभव झाला तर मनसेचे पोपट पाथरे तिसर्‍या राहिले. या पोटनिवडणुकीसाठी 44.61 टक्के मतदान झाले होते. त्याची मतमोजणी बुधवारी सकाळी जुन्या मनपा कार्यालयात झाली. महाविकास आघाडीचे उमेदवार तिवारी, भाजपचे परदेशी व मनसेचे पाथरे अशा तीन प्रमुख उमेदवारांमध्ये लढत झाली होती. मनसेचे पाथरे पहिल्या दोन फेर्‍यांत आघाडीवर होते. मात्र त्यांची आघाडी तिसर्‍या फेरीनंतर तुटली. परदेशी यांनी 517 मतांची आघाडी घेत विजय मिळविला. तिवारी यांना 2 हजार 589, परदेशी यांना 3 हजार 106 तर पाथरे यांना 1 हजार 751 मते पडली.

पारडे फिरत राहिले
पहिल्या फेरीत पाथरेंनी 703 मते घेऊन 400 मतांची आघाडी घेतली होती. या फेरीत तिवारींना 316 व परदेशींना 210 मते होती. दुसर्‍या फेरीत पाथरेंनी पुन्हा 300 मतांची आघाडी घेत 599 मते मिळवली. या फेरीत परदेशींना 299 व तिवारींना 2890 मते होती. पण यानंतरच्या चारही फेर्‍यात पाथरेंची मते कमी होत गेली. तिसर्‍या फेरीत तिवारींनी 574 मते मिळून सुमारे अडीचशे मतांची आघाडी घेतली. या फेरीत परदेशींना 308 व पाथरेंना 270 मते मिळाली. चौथ्या फेरीत तिवारींनी पुन्हा थोेडी म्हणजे 15 मतांचीच, पण आघाडी घेतली व याच फेरीपासून भाजपचे परदेशी यांचे रिंगणात पुनरागमन झाले. या फेरीत तिवारींना 520 व परदेशींना 504 तर पाथरेंना फक्त 94 मते मिळाली. त्यानंतर पाचव्या व सहाव्या फेरीत परदेशींनी बाजीच पलटून टाकली. पाचव्या फेरीत त्यांनी तब्बल 929 व सहाव्या फेरीत 856 मते घेऊन निर्णायक विजय मिळवला. या दोन्ही फेर्‍यांमध्ये तिवारींना अनुक्रमे 463 व 436 तर पाथरेंना 51 व 34 अशी मते मिळाली. शेवटच्या सहाव्या फेरीची मते जाहीर झाली आणि भाजपचे परदेशी यांनी 517 मतांनी सेनेच्या तिवारींना मात दिल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला. दरम्यान, रिंगणातील अन्य उमेदवारांपैकी ऋषिकेश गुंडला यांना 322, अजय साळवे मेंबरला 105 व संदीप वाघमारेला 184 मते मिळाली. निवडणुकीच्या अंतिम निकाला या अपक्षांच्या मतांची काहीही करामत दिसली नाही. विशेष म्हणजे नोटा (वरीलपैकी एकही नाही) या बटनावर 109जणांनी मतदान केले.

बालेकिल्ल्यात सेना अस्तित्वहीन
प्रभाग 9 मधील तोफखाना परिसर हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु, 2018मधील मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीत या प्रभागात शिवसेनेचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. सार्वत्रिक निवडणुकीत याच जागेवर सेनेचे सुरेश तिवारी यांचा पराभव झाला होता व आता झालेल्या पोटनिवडणुकीतही तिवारी यांना पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आता, या प्रभागात भाजप 2 व काँग्रेस 2 अशी नगरसेवक संख्या झाली आहे.

COMMENTS