पुराच्या पाण्यात अडकलेल्या 22 वाहनचालकांना वाचवण्यात यश!

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुराच्या पाण्यात अडकलेल्या 22 वाहनचालकांना वाचवण्यात यश!

गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने जिल्ह्यात पूरस्थिती झाली निर्माण.

चंद्रपूर प्रतिनिधी - चंद्रपूर(Chandrapur) जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सूरू आहे. इरई धरण(Erie Dam) आणि गोसेखुर्द(Gosekhurd) धरणाचे द

जपानने उडवला थायलंडचा धुव्वा; उपांत्य फेरीत धडक
तरडगांव येथील जयश्री अडसूळ बेपत्ता
बेरोजगारांना रोजगाराची सुवर्णसंधी… नावनोंदणी करण्याची गरज

चंद्रपूर प्रतिनिधी – चंद्रपूर(Chandrapur) जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सूरू आहे. इरई धरण(Erie Dam) आणि गोसेखुर्द(Gosekhurd) धरणाचे दरवाजे उघडल्या नंतर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. जवळपास दोन दिवसापासून 22 वाहनचालक आपल्या ट्रक मध्येच अडकून पडले होते. चंद्रपूर जिल्हा पोलिसांच्या बचाव पथका(Chandrapur District Police Rescue Squad) ला ही माहिती मिळताच त्यांनी सर्व वाहनचालकांना वाचवले आहे. गडचांदूर-धानोरा (Gadchandur-Dhanora)मार्गावरील भोयगाव(Bhoigaon) जवळ मध्यरात्री पोलीसांनी ही धाडसी कामगिरी केली आहे. पुरात अडकलेल्या वाहनचालकांना सुखरूप बाहेर काढल्याने वाहनचालकांनी पोलिसांचे आभार मानले .

COMMENTS