Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे-सातारा मार्गावर खंबाटकी घाटात मालट्रकसह कार जळाली

खंडाळा / प्रतिनिधी : पुणे-बंगळूर महामार्गावरील खंबाटकी घाटाच्या सातव्या वळणानजीक असलेल्या दत्त मंदिर कॉर्नर जवळ दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास माल ट्

भिडे वाडा स्मारक उभारणीचे काम लवकरच सुरू होईल ः मुख्यमंत्री शिंदे
शासकीय कार्यालयात पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट
पारा घसरल्याने महाराष्ट्र गारठला

खंडाळा / प्रतिनिधी : पुणे-बंगळूर महामार्गावरील खंबाटकी घाटाच्या सातव्या वळणानजीक असलेल्या दत्त मंदिर कॉर्नर जवळ दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास माल ट्रकने अचानक पेट घेतला. परिणामी या ट्रकच्या मागे असणार्‍या चार चाकी वाहनासही हाय लागल्याने पेट घेतला. या घटनेत दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कसलीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती समजताच तात्काळ खंडाळा पोलीस भुईंज टॅब स्टाफ व हायवे कर्मचारी घटनास्थळी पोचले. त्यावेळेस भुईंजवरुन अग्निशामक दलासही पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली.

या घटनेमुळे खंबाटकी घाटात वाहनांची रांग लागली होती. दरम्यानच्या काळात पोलिसांनी पुण्याहून साताराबाजूकडे जाणारी वाहतूक खंबाटकी बोगद्यातून विरुध्द बाजूने वळवली. मालट्रकला लागलेली आग ही खांबाटकी घाटात लागलेल्या वणव्यामुळे लागली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

COMMENTS