पिंपरी -चिंचवड महापालिकेत महापौर आपलाच होणार… संजय राऊत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पिंपरी -चिंचवड महापालिकेत महापौर आपलाच होणार… संजय राऊत

प्रतिनिधी : पुणे  येत्या महापालिकेत आपले असे नगरसेवक निवडून यायला हवेत, ज्यात आपण सत्तेतील महत्वाचे वाटकेरी असू. जसं राज्यात आहोत. महापालिकेचे कुण

उच्च शिक्षण संस्थाना उभारावे लागणार उद्यान
टाकळीच्या शंभर वर्षाच्या आजीने बजावला मतदानाचा हक्क
कोरोनापेक्षाही सात पटीने प्राणघातक महामारीचं संकट

प्रतिनिधी : पुणे 

येत्या महापालिकेत आपले असे नगरसेवक निवडून यायला हवेत, ज्यात आपण सत्तेतील महत्वाचे वाटकेरी असू. जसं राज्यात आहोत. महापालिकेचे कुणाचे कितीही आकडे आले तरी महापौर आपलाच होईल… मी असं म्हणत नाही की आम्ही शंभर जागा जिंकू… 

पण मी मागे म्हटल्याप्रमाणे ५५ जागा आल्या तरी आमचा मुख्यमंत्री होतो तर चाळीस-पंचेचाळीसला किमान पिंपरी-चिंचवडचा महापौर झाला पाहिजे. मागील वेळेस ४ च्या प्रभागाचा फटका आपल्याला बसला ,तसं त्यांना का नाही बसला?, असा सवाल विचारताना आपल्याला फटका बसला याचा अर्थ आपलं संघटन कमी पडले. पण मंचावर बसलेल्या लोकांनी एक एक नगरसेवक जरी निवडून आणला तरी पिंपरीच सेनेचा महापौर होईल, असंही राऊत सांगायला विसरले नाहीत.

राज्यात महाविकासआघाडीचं (Mahavikas Aghadi) सरकार आल्यापासून सत्तेतील तिन्ही पक्षांमध्ये विसंवाद असल्याची टीका विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून (BJP) केली जाते. अशा काही प्रसंगी हे मतभेद दिसून देखील आले आहेत. त्यामुळे राज्यातील सरकार अस्थिर असल्याचं विरोधकांकडून सातत्याने बोललं जात आहे. 

या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पुणे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीवरुन सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला इशारा दिला आहे. शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना लक्ष्य करत राऊत म्हणाले, अजित दादा, आमचं ऐका, नाहीतर गडबड होईल, असा सूचक इशारा संजय राऊत यांनी दिला.

पिंपरी-चिंचवडमध्ये महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे या ठिकाणी संजय राऊतांनी केलेल्या विधानाचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. ‘पालकमंत्री आपले नाहीत, पण राज्यात आपली सत्ता आहे. पण आपलं इथं कोणी ऐकत नाही असं म्हणतात. मुख्यमंत्री आपले आहेत, पालकमंत्री ही आपलेच आहेत. त्यांनी नाही ऐकलं तर त्यांना सांगावं लागेल. की मुख्यमंत्री दिल्लीला गेलेले आहेत आज? 

पण थोडं थांबा चुकीचं लिहू नका. ते दिल्लीचा अंदाज घ्यायला गेलेत, कारण आम्हाला उद्या दिल्लीवर ही राज्य करायचं आहे. कोण कुठं बसतात हे पाहतायेत, तिथं आपल्याला पोहचायचे आहे. त्याचा अंदाज घेत आहेत. त्यामुळं अजित दादांशी बोलू आपण, आपल्याला एकत्र काम करायचं आहे. ते ऐकतील नाहीतर अवघड होईल, असं संजय राऊत म्हणाले.

COMMENTS