पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेला मोठा झटका… नेत्यासह असंख्य कार्यकर्ते भाजपात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेला मोठा झटका… नेत्यासह असंख्य कार्यकर्ते भाजपात

पुणे : प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शहरामध्ये शिवसेनेला पहिला मोठा झटका आज बसला.  शिवसेनेच्या विद्यमान न

शिक्षक, पदवीधरची निवडणूक जाहीर
आता वर्षातून चार वेळा होणार मतदार नोंदणी
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित

पुणे : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शहरामध्ये शिवसेनेला पहिला मोठा झटका आज बसला. 

शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका अश्‍विनी चिंचवडे यांचे पती आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे (Gajanan Chinchwade) व 

कामगार नेते अमोल कलाटे (Amol Kalate) यांनी आज आपल्या असंख्य समर्थकांसह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

मुंबई येथे हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. यावेळी गजानन चिंचवडे यांनी चापेकर बंधू स्मारकाची प्रतिकृती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. 

यावेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप उपस्थित होते. गजानन चिंचवडे हे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांचे कट्टर समर्थक असल्याचे मानले जाते. 

त्यांच्या पत्नी शिवसेनेच्या दोन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. मागील स्थायी समितीच्या सदस्य पदावर त्यांची वर्णी लागणार होती. 

मात्र ऐनवेळी पक्षाने त्यांना स्थायी समिती सदस्यपद नाकारले. त्याच नाराजीतून त्यांचे पती गजानन चिंचवडे यांनी भाजपचे कमळ हाती घेतले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

COMMENTS