पिंपरी चिंचवडमध्ये बॉम्ब सापडल्याने खळबळ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पिंपरी चिंचवडमध्ये बॉम्ब सापडल्याने खळबळ

पिंपरी चिंचवड : शहरातील मध्य वस्तीत असलेल्या कोहिनूर इमारतीच्या परिसरात खोदकाम सुरु असताना एक बॉम्ब सापडला. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. हा शेल

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे होणार प्रशिक्षण
धक्कादायक… एकाच कुटुंबातील तिघांनी केली आत्महत्या… कारण…
कोल्हेंनी कर्तव्यातून कार्यसिद्धीला आपलेसे केले

पिंपरी चिंचवड : शहरातील मध्य वस्तीत असलेल्या कोहिनूर इमारतीच्या परिसरात खोदकाम सुरु असताना एक बॉम्ब सापडला. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. हा शेल बॉम्ब असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा बॉम्ब जिवंत आहे की नाही या बाबत बॉम्बनाशक पथक शोध घेत आहे.
दुपारी 10 ते 12 च्या दरम्यान पिंपरी मधील कोहिनूर सोसायटीच्या आवारात खोदकाम सुरू असताना जेसीबी चालकाला हा बॉम्ब आढळून आला. यावेळी उपस्थितांनी तत्काळ सोसायटी मधील चेअरमन यांना ही घटना कळवली. ज्या ठिकाणी बाँब आढळून आला त्या ठिकाणी पाहणी करत तो बाँब सील करून तपासणी साठी घेऊन गेले आहेत. हा शेल बॉम्ब असल्याची माहिती पिंपरी पोलिसांनी दिलीयहा बॉम्ब जिवंत आहे की नाही या बाबत बॉम्ब नाशक पथक शोध घेत आहे.

COMMENTS