खरवंडी कासार परिसरामध्ये अतिवृष्टी मध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी करण्यासाठी ऋषिकेश ढाकणे यांनी
खरवंडी कासार परिसरामध्ये अतिवृष्टी मध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी करण्यासाठी ऋषिकेश ढाकणे यांनी खरवंडी कासार मुंगूसवाडे भारजवाडी भाललगाव मिडसांगवी या विविध गावात येऊन पाहणी केली व लवकरच मदत मिळवून देऊ असे आश्वासन दिले
मुंगूसवडे येथे रस्त्याच्या पूल चुकीचा झाल्यामुळे पावसाचे पाणी अडुन शेजारी असणाऱ्या महादेव खेडकर या शेतकऱ्याच्या 1400 ते1500 कोंबड्या पाण्यात बुडून व काही वाहून गेल्या त्यासंदर्भात भेट दिली व रास्ता ठेकेदाराला पूल करण्यास सांगू न ऐकल्यास प्रांत कार्यालयात प्रांत साहेबांशी बोलून मोबदला मिळून देऊ असे सांगितले
भालगाव येथील संभाजीनगर वस्तीवरील नदीवरील पूल अतिवृष्टीमुळे वाहून गेलेला आहे. त्या पुलावरून अनेक लोकांचे जाणे येणे थांबले आहे त्यामुळे प्रथम पुलाची दुरुस्ती लवकरच करवून घेऊ व नंतर नवीन पूल लवकरात लवकर मार्चपर्यंत तयार करू असे आश्वासन दिले
मिडसागवी येथे पैठण पंढरपूर पालखी मार्ग काम चालू आहे. परंतु तेथील शेतकऱ्यांना रस्त्यामध्ये जमीन गेलेली आहे त्याचा मोबदला मिळालेला नाही. त्यासाठी 15सप्टेंबर रोजी विभागीय अधिकारी व रस्त्याचे काम पाहणारे गलांडे साहेब आले होते. त्यावेळेस श्री.ऋषिकेश ढाकणे साहेब यांनी त्यांना सांगितले की लवकरात लवकर शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळून द्यावा अन्यथा रस्त्याचे काम बंद पाडू व उपोषण करू जवळच्या गावातील शेतकऱ्यांना मोबदला दिला आहे. व येथील शेतकऱ्यांना अजून काही दिलेला नाही. तसेच सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे लवकर मिळावे अशी मागणी केली मागील आठवड्यात श्री.गडकरी साहेबांची भेट घेऊन राष्ट्रीय महामार्ग संदर्भात निवेदन दिले आहे तसेच पुन्हा ह्या महामार्गाचे निवेदन देऊ असे शेतकऱ्यांना सांगितले आपन सर्वजण प्रांतसाहेबांना भेटून निवेदन देऊ असे सांगितले
यावेळी भारजवाडी येथील जय भगवान युवा प्रतिष्ठान श्री गणेश रायाची व महाआरती ऋषिकेश ढाकणे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी किरण खेडकर काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दादासाहेब खेडकर पत्रकार महादेव बटुळे मंडळाच्या अध्यक्ष गणेश सानप बाबू बटुळे आदी गणेश भक्त उपस्थित होते
COMMENTS