Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परमबीर सिंह यांना न्यायालयाने फटकारले ; याचिका फेटाळली; कनिष्ठ न्यायालयात जाण्याचा सल्ला

सर्वोच्च न्यायालयाने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार देऊन उच्च न्यायालयात जायला सांगितले; मात्र उच्च न्यायालयानेही सिंग यांना झटका दिला.

सर्वांच्या सहकार्याने भिंगार बँकेची घोडदौड सुरु राहिल – चेअरमन अनिलराव झोडगे
गुढीपाडव्यानिमित्त बाजारात खरेदीचा उत्साह
एअर इंडिया विक्रीसाठी नव्याने निविदा

मुंबई/प्रतिनिधी: सर्वोच्च न्यायालयाने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार देऊन उच्च न्यायालयात जायला सांगितले; मात्र उच्च न्यायालयानेही सिंग यांना झटका दिला. उच्च न्यायालयाने सिंग यांना थेट कनिष्ठ न्यायालयात जायला सांगितले आहे. तसेच एफआयआर दाखल न करता सीबीआयची चौकशी कशी? थेट सीबीआयकडे चौकशी दिल्याचे एक तरी उदाहरण दाखवा, असा सवाल करतानाच तुम्ही कायद्यापेक्षा मोठे आहात का?, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सिंग यांना फटकारले आहे.

सिंग यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या वेळी त्यांनी काही सवाल केले. फिर्याद दाखल न करता सीबीआय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे एक तरी उदाहरण दाखवा. त्यामुळे आधी या प्रकरणी फिर्याद दाखल करा. त्यानंतरच याप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिले जाऊ शकतात, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या वेळी सिंग यांचे वकील विक्रम नानकानी यांनी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी पोलिस महासंचालकांना सादर करण्यात आलेल्या अहवालाकडेही न्यायालयाचे लक्ष वेधले. या अहवालात बदल्याच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले; मात्र मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी त्यावर काहीही कारवाई करण्यात आली नाही, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. या वेळी मुख्य न्यायामूर्ती दीपंकर दत्ता म्हणाले, की विचार करण्यासारखे दोनच मुद्दे या वेळी उपस्थित करण्यात आले आहेत. ही याचिका जनहित याचिकेच्या श्रेणीत येते का? आणि न्यायालय एफआयआर दाखल केल्याशिवाय सीबीआय चौकशीचे आदेश देऊ शकते का? हेच ते दोन मुद्दे आहेत. तुमच्यासमोर एखादा गुन्हा घडत असेल आणि तरीही तुम्ही एफआयआर दाखल करत नसाल, तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या कर्तव्यात कसूर करत आहात असा होतो. तुम्ही तेव्हाच एफआयआर दाखल करायला हवा होता, अशा शब्दांत मुख्य न्यायामूर्ती दत्ता यांनी सिंग यांना फटकारले. तुम्ही जर एक पोलिस अधिकारी आहात तर कायद्याचे पालन करणे तुमच्यासाठी महत्त्वाचे नाही का? पोलिस अधिकारी, मंत्री आणि नेते हे कायद्यापेक्षा मोठे आहेत का? कायद्यापेक्षा तुम्ही मोठे आहात हे समजू नका, अशा शब्दांत न्यायमूर्ती दत्ता यांनी सिंग यांच्यावर ताशेरे ओढले.

COMMENTS