Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एक व्यक्ती देते कोरोनाचा चारशे जणांना प्रसाद

राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाही अनेक जण मास्क घालताना दिसत नाहीत.

विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याच्या विविध संधी उपलब्ध आहे : योगेश गलांडे
राहुरी तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी ऍड. तोडमल 
जामखेड सेंट्रल बँकेत कॅश टंचाई; अधिकाऱ्यांची उद्धट भाषा ; ग्राहकांचा संताप

मुंबई / प्रतिनिधी: राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाही अनेक जण मास्क घालताना दिसत नाहीत. अनेक जण मुखपट्टी गळ्याशी लावूनच असतात; पण तोंड आणि नाक झाकले जाईल, अशा पद्धतीने मुखपट्टी घालत नाही. मुखपट्टी न  घालणारा एक माणूस ४०० लोकांना संक्रमित करू शकतो. 

मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने लोकांच्या मनातली कोरोनाची भीती दूर झालेली. त्यामुळे बरेच जण मुखपट्टी घालायला टाळाटाळ करत आहेत. मुखपट्टी न घालण्याचा बेफिकीरीपणा एका-दुसऱ्याच्या नाही, तर तब्बल चारशे जणांच्या जिवावर बेतू शकतो. संख्येवर न जाता लोकांनी मुखपट्टी वापरली पाहिजे.

COMMENTS