परभणी जिल्ह्यासाठी 1 हजार 86 क्विंटल साखरेचे नियतन प्राप्त

Homeमहाराष्ट्रमराठवाडा

परभणी जिल्ह्यासाठी 1 हजार 86 क्विंटल साखरेचे नियतन प्राप्त

परभणी :- जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 2021 या तीन महिन्यासाठी 1 हजार 86 क्विंटल साखरेचे नियतन प्राप्त झाले आहे. परभणी जिल्ह्यासाठी यशस्वी साखर

परभणी बसस्थानकावरील सुविधांची आ.राहुल पाटील यांच्याकडून पाहणी
असंख्य कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात दाखल; प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत मुंबईत सोहळा
नांदेड लोकसभेसाठी रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी

परभणी :- जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 2021 या तीन महिन्यासाठी 1 हजार 86 क्विंटल साखरेचे नियतन प्राप्त झाले आहे. परभणी जिल्ह्यासाठी यशस्वी साखर पुरवठादार म्हणून विजय ट्रेडर्स नांदूरा यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती परभणीचे जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी दिली आहे.
साखर नियतन क्विंटलमध्ये तालुका व गोदामनिहाय पुढीलप्रमाणे आहे. परभणी-300, पुर्णा-107, पालम-85, गंगाखेड-110, सोनपेठ-43, पाथरी-90, सेलू-158, मानवत-65, जिंतूर-81, बोरी-47 याप्रमाणे तिमाही साखर नियतन प्राप्त झाले आहे. साखर नियतन फक्त अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना प्रतिमहा प्रतिशिधापत्रिका एक किलो याप्रमाणे आहे. साखरेचा विक्री दर प्रति किलो 20 रुपये किरकोळ दराने वाटप करण्यात येणार आहे. असेही कळविण्यात आले आहे.

COMMENTS