जिल्ह्यात पाथर्डी पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद:- पोलीस अधिक्षक मनोज पाटील

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्ह्यात पाथर्डी पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद:- पोलीस अधिक्षक मनोज पाटील

अभिजित खंडागळे/पाथर्डी : गेल्या दोन तीन वर्षांपासून पाथर्डी पोलीस ठाण्यातील १५४० गुन्हे इतर प्रलंबित प्रकरणे होती.त्यातील सात महिन्याच्या कालावधीमध्

नगरच्या उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्याच्या दिशेने ; खांबांवर सिमेंट प्लेटा टाकल्या जाणार, सहा महिने चालणार काम
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची श्री विशाल गणेश मंदिराला भेट
शेत रस्ते मिळवून देण्याकरीता पुढाकार… भाऊबीजच्या दिवशी चळवळीची सुरुवात

अभिजित खंडागळे/पाथर्डी : गेल्या दोन तीन वर्षांपासून पाथर्डी पोलीस ठाण्यातील १५४० गुन्हे इतर प्रलंबित प्रकरणे होती.त्यातील सात महिन्याच्या कालावधीमध्ये १३७६ प्रकरणे निरगती करण्यात आली असून त्याचा अहवाल कोर्टात पाठवण्यात आला आहे.पाथर्डी ठाण्याच्या कामकाजाची माहिती देताना अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक मनोज पाटील बोलत होते. पाथर्डी पोलीस ठाण्याचे कर्मचारी सचिन नवगीरे, जॉन भिंगारदिवे,सुहास बटुळे,ज्ञानेश्वर रसाळ,आजीनाथ बडे,यांनी गुन्ह्याची निरगती चांगली प्रकारे केल्याबद्दल त्यांचा सन्मान पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी पाथर्डी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण पाथर्डी पोलीस सहाय्यक निरीक्षक रामेश्वर कायंदे,कौशल्यराम निरंजन वाघ,भगवान सानप,ईश्वर गर्जे,निलेश म्हस्के आदी जण उपस्थित होते. पुढे पाटील बोलताना पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी म्हटले की,मागील वर्षी पोलीस ठाण्याच्या कामकाजाची तपासणी करण्यासाठी आलो तेव्हा प्रलंबित गुन्ह्याची संख्या मोठ्या प्रमाणावर होती.अशा गुन्ह्याचा परिणाम इतर गुन्ह्याच्या तपासावर निश्चित होतो.हे गुन्हे कमी झाले तर नवीन गुन्ह्यात योग्य पद्धतीने पुरावे गोळा करत तातडीने तपास करत न्यायालायात अहवाल सादर करायला मदत होते.त्या दृष्टीने यापुढील काळातही गुन्ह्याचा तपास रिकव्हरी मार्गी लागतील.तसेच प्रथम प्राधान्याने सर्व सामान्य लोक ज्या अपेक्षेने येतात त्या अपेक्षांची पूर्तता होईल असे निरदेश देण्यात आले आहेत.पाथर्डीच्या जनतेने अन्याय झाला असेल तर त्याची नोंद पोलीस ठाण्याला करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.

COMMENTS