Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पढेगांवला पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपण

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे या संतवाणीप्रमाणे वर्तमानात वृक्ष लागवड आणि संगोपन करण्यासाठी जनजागृती करावी लागत आहे.

आमदारांमुळे शहराची दुरवस्था; काळे यांचा आरोप; आसूड मोर्चाचा दणदणाट
सात नंबर अर्ज भरणार्‍या सर्व शेतकर्‍यांना पाणी द्या
ग्राहक संरक्षण संस्थेचे आमकर यांनी अकोल्यात घेतला आढावा

कोपरगाव प्रतिनिधी -वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे या संतवाणीप्रमाणे वर्तमानात वृक्ष लागवड आणि संगोपन करण्यासाठी जनजागृती करावी लागत आहे.वातावरणातील ढासाळलेला समतोल राखण्यासाठी वृक्ष नितांत गरजेचे आहे.कोरोनाने अॉक्सीजनचे महत्त्व दाखवून दिले आहे.त्यामुळे पर्यावरण दिनाचे औचित्य साधत पढेगांव ग्रामपंचायतच्या वतीने वृक्षरोपण करण्यात आले. 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात सरपंच प्रकाश शिंदे,सिव्हिल इंजिनियर बाबासाहेब शिंदे,दिलीप दाणे,संपत तरटे,पंढरीनाथ म्हस्के,किशोर मोकळ,संतोष शिंदे , ग्रामसेवक योगेश देशमुख ग्रामपंचायत कर्मचारी नारायण शिंदे यांच्या उपस्थितीत सकाळी वृक्ष लागवड करण्यात आली.

COMMENTS