पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे लाईव्ह दर्शन घरबसल्या घेता येणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे लाईव्ह दर्शन घरबसल्या घेता येणार

सोलापूर : संपूर्ण भारतातील भाविकांचे श्रद्धास्थान तसेच आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे लाईव्ह दर्शन आता भाविकांना जिओ टीव

नाथषष्ठी सोहळ्यात लाखो भाविकांची मांदियाळी
गर्भपाताच्या औषधांची प्रिस्क्रीप्शनशिवाय विक्री प्रकरणी अमेझॉन व फ्लिपकार्टला नोटीस
लातुरात आता पशुरोग निदान प्रयोगशाळा

सोलापूर : संपूर्ण भारतातील भाविकांचे श्रद्धास्थान तसेच आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे लाईव्ह दर्शन आता भाविकांना जिओ टीव्ही च्या माध्यमातून घरबसल्या घेता येणार आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविकांसाठी जिओ तर्फे ही एक अनोखी भेट असणार आहे.आषाढी तसेच कार्तिकी एकादशी ला पंढरपूर येथे भाविकांचा महासागर विठ्ठलाच्या दर्शनासाठी जमतो. लाखो भाविक तासन तास रांगेत उभे राहून आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शन घेतात. परंतु सर्वाना कोरोना महामारीमुळे आणि अन्य कारणाने पंढरपूर येथे जाऊन दर्शन घेणे शक्य होत नाही. वयोवृद्ध तसेच आजारी भाविकांना इच्छा असूनही दर्शन घेता येत नाही परंतु आता जिओ टीव्ही च्या माध्यमातून ही अडचण दूर होणार आहे. आता घरबसल्या कधीही 24 तास पांडुरंगाचे दर्शन घेता येणार असून महापूजा, अभिषेक तसेच इतर विधी घरबसल्या भाविकांना पाहता येणार आहेत. जिओ टीव्ही अँप डाउनलोड करून तसेच क्यू आर कोड स्कॅन करून देखील लाईव्ह दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.

COMMENTS