नितीन गडकरींनी घेतला दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग योजनेचा आढावा

Homeताज्या बातम्यादेश

नितीन गडकरींनी घेतला दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग योजनेचा आढावा

नवी दिल्ली : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी गुरुवारी हवाई माध्यमातून दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग योजनेचा आढावा घेतला. यावेळी राजस्थानचे मंत्र

भांडण सोडविणे टपरी चालकाला पडले महाग | LOKNews24
संस्काराच्या नावाखाली पंतप्रधानच संविधानाला कनिष्ठ संबोधतात तेव्हा..!
वर्सोवा पुलाची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली

नवी दिल्ली : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी गुरुवारी हवाई माध्यमातून दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग योजनेचा आढावा घेतला. यावेळी राजस्थानचे मंत्री बकुली दास कल्ला, खासदार जसकौर मीणा, कोरोडी लाल मीणा आणि केंद्र व राज्य सरकारचे अधिकारी उपस्थित होते. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग योजनेच्या निरीक्षण कार्यक्रमाचा भाग म्हणून मान्यवरांनी एकंदर प्रकल्पाच्या प्रगतीचे निरीक्षण केले आणि आढावा घेतला. या योजनेद्वारे राजस्थानमध्ये 16,600 कोटींच्या निधीच्या माध्यमातून 374 किमी चा मार्ग निर्माण होईल ज्याचे कार्य संबंधित संस्थांना सोपविण्यात आले आहे. राज्यात हा द्रुतगती मार्ग लवर, भरतपुर, दौसा, सवाई माधोपुर, टोंक, बूंदी आणि कोटा जिल्ह्यांना विकास कार्यास सुदृढ करेल. नितीन गडकरी यांनी ही माहिती ट्वीटर द्वारे दिली.

COMMENTS