नाशिक : वालदेवी नदीत बुडून ६ जणांचा मृत्यू

Homeमहाराष्ट्रमुंबई - ठाणे

नाशिक : वालदेवी नदीत बुडून ६ जणांचा मृत्यू

नाशिक शहरातील सिडकोमधील सिंहस्थनगरमधील फिरण्यास गेलेल्या सहा नागरिकांचा शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेदरम्यान वालदेवी नदीत बुडून मृत्यू झाला.

वाचनाने मिळते जीवनाला योग्य दिशा-रवींद्र मालुंजकर 
सहकार चळवळीत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला
नव्या काळातील आव्हाने लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या गरजा पूर्ण करू : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नाशिक : नाशिक शहरातील सिडकोमधील सिंहस्थनगरमधील फिरण्यास गेलेल्या सहा नागरिकांचा शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेदरम्यान वालदेवी नदीत बुडून मृत्यू झाला. यामध्ये पाच मुली व एका मुलाचा समावेश आहे. पोलिसांनी काल एका मुलीचा मृतदेह नदीच्या पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे. तर आज सकाळी इतर मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.

सिंहस्थनगरमधील नऊजण वाढदिवस साजरा करण्यासाठी शुक्रवारी वालदेवी नदी परिसरात फिरण्यास गेले होते. सायंकाळी सहा वाजेदरम्यान सर्वजण पाण्याजवळ फोटो काढण्यासाठी उभे होते. त्यावेळी पाण्यात तोल जावून काहीजण पडले. पोहता येत नसल्याने सर्वांनी त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली. पोहता येत नसल्याने सहाजण पाण्यात बुडाले. सायंकाळी ७ वाजेनंतर अंधार झाल्याने बचावकार्यात अडथळा निर्माण झाला होता. घटनास्थळी वाडीवर्‍हे पोलीस, तहसीलदार व अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर दाखल केले आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी बचावकार्य सुरु केले. दरम्यान शनिवारी सकाळी एकूण ६ मृतदेह सापडले आहेत

COMMENTS