नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सीजन गळती; २२ रुग्ण दगावले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सीजन गळती; २२ रुग्ण दगावले

नाशिकमध्ये कोरोनाचे थैमान सुरू असून आज पुन्हा एक धक्कायक घटना महापालिकेच्या डॉ झाकीर हुसेन रुग्णालयात घडली आहे.

मोटारसायकलवरील मधल्याने महिलेचे गंठण धूमस्टाईलने पळविले
उत्तरप्रदेशात पोलिस भरतीचा पेपर फुटला
राजकीय मुखवटे

नाशिक :-नाशिकमध्ये कोरोनाचे थैमान सुरू असून आज पुन्हा एक धक्कायक घटना महापालिकेच्या डॉ झाकीर हुसेन रुग्णालयात घडली आहे. या रुग्णालयात आज ऑक्सिजन टॅंक रिफिल करत असतांना गॅस गळती झाली. ही गॅस गळती रोखण्यासाठी अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाला असून गॅस गळती रोखण्यात येत आहे. 

मात्र यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णापैकी २२ रुग्ण दगवल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून येथील रुग्णांना तातडीने अन्यत्र हलविण्यात आले आहे. नाशिक मनपाच्या झाकीर हुसेन रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरु होते. आज दुपारी १२.३० च्या सुमारास टँकरच्या सहाय्याने ऑक्सिजन गॅस रिफिल करताना लिकेजमुळे ऑक्सीजनचा पुरवठा खंडीत झाला. त्यात व्हेंटीलेटरवर असलेले एकूण २२ रुग्ण दगावले असून मृतांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच लोकप्रतिनिधी अधिकारी वर्ग रुग्णालयात दाखल झाले असून तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन मदत केली जात आहे.

COMMENTS