कालच्या पत्रकार परिषदेत सध्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यांच्यावर अतिशय गंभीर असणारा आरोप केल्यानंतर नवाब मलिक यांनी दुसऱ्या दिवशी दहा व
कालच्या पत्रकार परिषदेत सध्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यांच्यावर अतिशय गंभीर असणारा आरोप केल्यानंतर नवाब मलिक यांनी दुसऱ्या दिवशी दहा वाजेपर्यंत थांबायचे आव्हान केले होते; याचा अर्थ मलिक आता फडणवीसांचा राजकीय कोथळाच काढणार! पण, झाले भलतेच. फडणवीस यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही, अशा घणाघाती आरोपाचे आश्वासन देणारे मलिक प्रत्यक्षात मात्र फुसका बॉम्ब आपटत गेले!
ज्या त्वेषाने गेले काही दिवस नवाब मलिक यांनी आक्रमक रूप धारण केले होते, त्याच्या अगदी विपरीत म्हणावे असा फालतू म्हणता येईल असा आरोप त्यांनी फडणवीस यांच्यावर केला; एखाद्या गुंडाला महामंडळाची नियुक्ती देणं हा तर सर्वांचा सत्ताप्रघात झालाय. त्यामुळे मुन्ना यादव च्या आरोपात फार काही स्फोटक आहे, असं नाही. याउलट कालपर्यंत नवाब मलिक यांच्या आरोपसत्रांनी भाजपच्या गोटात घबराट नव्हे तर थरकाप उडवला होता, याचा अदमास भाजप नेत्यांच्या वक्तव्यावरुन येत होता. कालपरवा भाजपचे टारझन असलेले नेते गिरीश महाजन यांनी नवाब मलिक यांच्याकडून खालच्या स्तराचे राजकारण केले जात असल्याचा आरोप केला होता. हे वक्तव्य भाजप गोटात उडालेला थरकाप दर्शवणारेच. नवाब मलिक यांनी हाॅटेलचा संदर्भ देत ‘ ते फोटो व्हायरल केले तर फडणवीस यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असे म्हणताच गिरीश महाजनांचे वक्तव्य आले होते. या वक्तव्यांचा सरळ अर्थ असाच होता की, मलिक यांच्याकडे फडणवीस यांच्या विरोधात खरंच फडणविसांची राजकीय कारकीर्द उध्वस्त होईल; सर्वसामान्यपणे सर्वांच्याच मनात असा विचार आला असावा. पण, आम्हाला खचितच, तसे वाटले नव्हते. एखाद्या राजकीय व्यक्तिचे अंडरवर्ल्ड शी संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर त्या संबंधित नेत्याच्या विरोधात एखादा आरोप करण्यासाठी चोवीस तासाची मुदत आव्हान करून घेतली; तेव्हाच हे स्पष्ट झाले की, मलिकांकडे स्फोटक बाॅम्ब भरपूर आहेत. परंतु, सत्तेच्या राजकारणात गोष्टी इतक्या सरळ घडविता येत नाहीत. मलिकांकडे खूप स्फोटक माहिती असतानाही ते देऊ शकले नाहीत, यामागे धुरंधर नेते शरद पवार यांचाच हात असावा. फडणवीस यांनी मलिकांच्या विरोधात पुरावे शरद पवार यांच्याकडे सोपवणार असं म्हटल्याने, त्या वक्तव्याचा सरळ अर्थ हाच होता की शरद पवार यांनी आता मध्यस्थी करावी.
आक्रमक विरोधी पक्षनेता म्हणून वावरताना फडणवीस स्वतःला फार मुत्सद्दी व धुरंधर राजकारणी समजता. त्या या समजाचा गैरसमज पवारांना दूर करायचा होता एवढेच! वास्तविक शरद पवार यांना आपल्याच पक्षाच्या लोकांची इत्यंभूत माहिती नसेल, हा फडणवीसांचा अप्रत्यक्ष दावा त्यांनी रेटून नेला. पवार हे तडजोड आणि समन्वयाचे राजकारण करतात. निर्णायक राजकारण करण्याइतपत त्यांचा पक्ष व नेते म्हणून ते सक्षम नाहीत. निर्णायक राजकारण करताना कधी कधी तोटे होतात हे खरं असलं तरी निर्णायक राजकारणाशिवाय तुम्हाला पूर्ण बहुमताची सत्ताही घेता येत नाही. परंतु, पवारांनी आपले नेतृत्व फक्त वरच्या जातवर्गांच्या हितासाठी मर्यादित ठेवले असल्याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा फडणवीस विरोधात घेतल्या गेलेल्या मलिक यांच्या पत्रकार परिषदेत जाणवतो. उच्च जातवर्गीय असलेल्या आणि थेट सनातन ब्राह्मण असणाऱ्या राजकीय नेत्याला मलिक यांनी दिलेले स्फोटक आव्हान पवारांनी फुसके ठरवले. निर्णायक लढाईसाठी सज्ज झालेल्या नेत्याचाच हा भ्रमनिरास नाही, तर, महाराष्ट्रातील लोकांचा मलिक यांच्या आक्रमकतेवर जो विश्वास निर्माण झाला होता, तोच धाराशयी झाला. आता, मलिक दिवसेंदिवस डिफेन्सवर जातील आणि फडणवीस व पर्यायाने भाजप आक्रमक होईल! अन् ही संधी पवारांनी निर्माण करून दिली असा त्याचा थेट अर्थध्वनीत होइल! थोडक्यात काय, तर महाराष्ट्राचा सत्ताधारी, विपक्ष, मुत्सद्दी आणि निर्णायक नेता मीच, हे शरद पवार यांनी दाखवून दिले.
COMMENTS