नवरा पाहिजेल तर पाच लाख दे….

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवरा पाहिजेल तर पाच लाख दे….

पत्नीकडून खंडणी मागणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

डोंबिवली प्रतिनिधी - पैसे परत करत नसल्याने एका व्यक्तीला डांबून ठेवत त्याच्या पत्नीकडे 5 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या खंडणीखोराला डोंबिवली(Dombivli

हदगाव तालुक्यातील नागरिकांच्या धान्य वितरण व राशनकार्डच्या तात्काळ त्वरित समस्या सोडवा.
प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये वसंतपंचमी  उत्स्फूर्त साजरी  
शिंदेशाही सरकार आल्याच्या 24 तासांच्या आतच, शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस .

डोंबिवली प्रतिनिधी – पैसे परत करत नसल्याने एका व्यक्तीला डांबून ठेवत त्याच्या पत्नीकडे 5 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या खंडणीखोराला डोंबिवली(Dombivli) तील टिळक नगर पोलिसांनी(Tilak Nagar Police) अटक केली आहे. अतुल व्यापारी(Atul Traders) असे सुटका करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अजय जाधव(Ajay Jadhav) असे खंडणी मागणाऱ्या आरोपीचे नाव आहे. एका व्यवहारात अजयने दिलेले 2 लाख 80 हजार रुपये अतुल व्यापारी हे परत करत नसल्याने त्यांचे अपहरण  करुन मारहाण केली. अजय जाधव हा रेल्वेत मॅकेनिक(Mechanic in Railways) आहे. खंडणी मागितल्याप्रकरणी व्यापारी यांच्या पत्नीने टिळक नगर पोलिसात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी सापळा रचून खंडणी मागणाऱ्या आरोपीला रंगेहाथ पकडून अतुल यांची सुखरूप सुटका केली आहे.

COMMENTS