Homeशहरंअहमदनगर

नगर तालुक्यात विद्यार्थ्यांची लसीकरणासाठी हेडसाळ मंत्र्यांचे दुर्लक्ष !

अहमदनगर प्रतिनिधी- गेल्या दीड ते दोन वर्षा पासून कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे शालेय विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.आता राज्या मध्ये नोकरीसाठी

पत्नीला चक्क पेट्रोल ओतून जिवंत जाळल्याची खळबळजनक घटना| LOK News24
बुलडाण्यात टिप्पर उलटून 13 मजुरांचा मृत्यू l DAINIK LOKMNTHAN*
संजीवणी युवा प्रतिष्ठाणच्या संकल्पनेतून कोरोना योद्ध्यांचा सन्मान

अहमदनगर प्रतिनिधी- गेल्या दीड ते दोन वर्षा पासून कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे शालेय विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.आता राज्या मध्ये नोकरीसाठी स्पर्धा परीक्षांचे नियोजन सुरू झाले आहे. त्यांना परीक्षेला बसण्यासाठी लसीकरणाबाबतच्या अटी व शर्ती घालण्यात आले आहेत परंतु विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचे लसीकरणाचे डोस उपलब्ध होत नाही लसीकरण केंद्रावर डोस घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. नगर तालुक्यात मंत्र्यांच्या दुर्लक्षामुळे लस उपलब्ध होत नाही त्यामुळे या विद्यार्थ्यांना विविध केंद्रासह नगर शहरामध्ये हेलपाटे मारावे लागत आहे यासाठी जिल्ह्या प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या लसीकरणा कडे लक्ष द्यावे जेणेकरून त्यांचे स्पर्धा परीक्षेचे नुकसान होणार नाही.परीक्षेला बसण्यासाठी दोन्ही डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसता येणार असल्याची अट असल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.विशेष करून या त्रासाला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागते, कुठल्याही प्रकारची लसीकरनाची शाश्वता नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी शासनाच्या वतीने स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रमाने लसीकरणाचे डोस उपलब्ध करून दयावे,नगर तालुक्यात सध्या विद्यार्थ्यांना लसीकरणासाठी केंद्रावर हेलपाटे मारावे लागत आहे.तरी तातडीने प्रशासनाने लसीकरणाचे नियोजन प्राधान्यक्रम करावे अशी मागणी भाजपाचे युवा जिल्हा सरचिटणीस अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी केली आहे.

COMMENTS