Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 मोफत नेत्र तपासणी शिबिराचा 75 रुग्णांनी घेतला लाभ

कोपरगाव/प्रतिनिधी : तालुक्यातील वारी येथील राहुल मधुकरराव टेके पाटील चँरिटेबल ट्रस्ट संचलित मोफत मदत सेवा केंद्राच्या प्रथम वर्धापन दिन व स्वातंत

कार्यकर्ते आ. जयंत पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे
दिलीपराव आघाव यांची वंजारी महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी निवड
राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत कोपरगावच्या पाच खेळाडूंची निवड

कोपरगाव/प्रतिनिधी : तालुक्यातील वारी येथील राहुल मधुकरराव टेके पाटील चँरिटेबल ट्रस्ट संचलित मोफत मदत सेवा केंद्राच्या प्रथम वर्धापन दिन व स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या समारोप निमित्त नाशिक येथील तुलसी आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच वारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया निदान शिबीर संपन्न झाले.
या शिबिरात सुमारे 75 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. यावेळी जवळपास 20 पेक्षा जास्त रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वसंतराव जाधव होते.कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राहुल टेके पाटील यांची प्रतिमापूजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी वैजापूर उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत त्रिभुवन, वैजापूर येथील पत्रकार किशोर साळुंखे, उपक्रमशील शिक्षक कुंडलिक वाळेकर, कोपरगाव बाजार समितीचे माजी सभापती सुरेश जाधव, चित्रपट निर्माते राजेंद्र गायकवाड,माजी सरपंच बद्रीनाथ जाधव, ग्रामविकास अधिकारी दिलीप वारकर, कामगार तलाठी प्रसाद कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोषी पावडे, नरेंद्र लालवाणी, भाऊसाहेब टेके,मधुकर टेके, रावसाहेब जगताप, प्रताप टेके, सोमनाथ थोरात, तुकाराम मोरे, दौलत वाईकर, संजय कवाडे, बापू पवार, विलास गाडेकर, दत्तात्रय गोंडे, अशोक मलिक, सोपान मलिक, रमेश कोकाटे, भास्कर आदमाने,अशोक बोर्डे, रविंद्र टेके,जितेंद्र टेके उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय राहुल दादाच्या सामाजिक कार्याच्या आठवणीना उजाळा दिला. तसेच मोफत मदत सेवा केंद्रातून गेल्या वर्षभरात झालेल्या कामाचे कौतुक केले. यावेळी तुलसी आय हॉस्पिटलचे डॉ. हर्षल पाठक यांनी रुग्णांची तपासणी केली.  शिबिराच्या  यशस्वितेसाठी विजय निळे, चंद्रकांत पाटील, मच्छिंद्र मुरार, अशोक निळे, मधुकर सोनवणे, संतोष तळेकर, योगेश शिंदे, अंबादास गिरी, स्वप्नील टेके, बिपीन टेके, साईराज टेके, अनुराग टेके, प्रथमेश शिंदे यांच्यासह सर्व मित्र परिवार, ग्रामस्थ, कुटुंबीय तसेच वारी ग्रामपंचायतचे कर्मचारी, वारी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार ट्रस्टचे अध्यक्ष पत्रकार रोहित टेके यांनी आभार मानले.

COMMENTS