नगर तालुक्यातील नागरदेवळे होणार लवकरच नगरपालिका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर तालुक्यातील नागरदेवळे होणार लवकरच नगरपालिका

नगर तालुक्यातील नगरपालिकेच्या निकषात बसणार्‍या नागरदेवळे, वडारवाडी, केतकी-शहापूर या तीन ग्रामपंचायती मिळून लवकरच नगरपालिका होणार आहे.

पाथर्डीत महिलेबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल
व्यापारी संकुलाचे आज खा. शरद पवारांच्या हस्ते भूमिपूजन
श्री योगीराज त्रिंबकराज दिंडी आर्दश दिंडी सोहळा

अहमदनगर/प्रतिनिधी- नगर तालुक्यातील नगरपालिकेच्या निकषात बसणार्‍या नागरदेवळे, वडारवाडी, केतकी-शहापूर या तीन ग्रामपंचायती मिळून लवकरच नगरपालिका होणार आहे. या प्रस्तावावर लवकरच अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. 

    नगर तालुक्यातील पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, बर्‍यापैकी शहरीकरण झालेले असतानाही नागरदेवळे, वडारवाडी, केतकी-शहापूर या भागांचा विकास झाला नाही. ग्रामपंचायत असल्याने येथे विकासात्मक योजना राबविण्यात मर्यादा येतात. यामुळे या तीनही ग्रामपंचायतींचे नगरपालिकेत रुपांतर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. लवकरच यावर अंतिम निर्णय होईल. शासनस्तरावरून माहिती संकलित करण्याची कार्यवाही सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. ग्रामीण पाणीपुरवठा योजना सातत्याने अडचणीत येत असल्याने या योजनांचे धोरण बदलणार आहे. त्याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच यात धोरणात्मक बदल होणार आहेत, असे सांगून ते म्हणाले, पिंपळगाव माळवीतलाव परिसरातील जेऊर, डोंगरगण, मांजरसुंभा, धनगरवाडी व इतर गावातील पाणी योजना आता सौरऊर्जेवर चालविण्यात येणार आहे. त्या योजना आता महावितरणला जोडणार असून त्यासाठी 60 लाखांचा खर्च येणार आहे. यामुळे योजना स्वयंपुर्ण होतील ग्रामपंचायतीना आर्थिक उत्पन्नही मिळु शकेल. जिल्ह्यात वीज उपकेद्रांची निर्मिती करण्यात आली असुन त्यात नगर तालुक्यातील डोंगराचा समावेश आहे, असेही त्यांनी सांगितले.

COMMENTS