नगरसह संगमनेर-कोपरगाव व श्रीरामपूरला वाढते रुग्ण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरसह संगमनेर-कोपरगाव व श्रीरामपूरला वाढते रुग्ण

कोरोनाचा संसर्ग पुन्हा झपाट्याने पसरू लागला आहे.

LOK News 24 I अल्पवयीन मुलीवर सलग दोन आठवडे बलात्कार
कळसुबाई शिखर आणि भंडारदरा धरण परीसरात नवीन वर्षासाठी प्रशासन सज्ज
सरसकट पंचनामे करून शेतकर्‍यांना भरीव मदत द्या ः नागरे

अहमदनगर/प्रतिनिधी- कोरोनाचा संसर्ग पुन्हा झपाट्याने पसरू लागला आहे. नगर शहरासह संगमनेर व श्रीरामपूरमध्ये नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. गुरुवारी नगरला 352, कोपरगावला 144, श्रीरामपूरला 91 व संगमनेरला 64 रुग्ण सापडले आहेत. 829 रुग्णांना डिस्चार्ज तर नव्या 1319 बाधितांची रुग्ण संख्येत भर पडली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.25 टक्के आहे.

जिल्ह्यात आता बरे झालेल्या रुग्णांची संख्या 87 हजार 819 इतकी झाली आहे. मात्र, जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत 1319 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 7200 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 447, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 400 आणि अँटीजेन चाचणीत 472 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 188, अकोले 36, जामखेड 29, कर्जत 5, नगर ग्रामीण 26, नेवासा 11, पारनेर 17, पाथर्डी 23, राहाता 2, संगमनेर 48, शेवगाव 9, श्रीगोंदा 7, श्रीरामपूर 20,  कँटोन्मेंट बोर्ड 23, मिलिटरी हॉस्पिटल 2 आणि इतर जिल्हा 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 137, अकोले 1, जामखेड 3, कर्जत 3, कोपरगाव 44, नगर ग्रामीण 12, नेवासा 14, पारनेर 7, पाथर्डी 8, राहाता 51,  राहुरी 22, संगमनेर 10, शेवगाव 13, श्रीगोंदा 10, श्रीरामपूर 44, कँटोन्मेंट 6,  इतर जिल्हा 14 आणि इतर राज्य 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत 472 जण बाधित आढळून आले. मनपा 37, अकोले 26, कर्जत 42, कोपरगाव 100, नगर ग्रामीण 20, नेवासा 75, पारनेर 4, पाथर्डी 34,  राहाता 10, राहुरी 29, संगमनेर 6, शेवगाव 31, श्रीगोंदा 17,  श्रीरामपूर 27, कँटोन्मेंट बोर्ड 10 आणि इतर जिल्हा 4 अशा रुग्णांचा समावेश आहे. डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 239, अकोले 27, जामखेड 4, कर्जत 32,  कोपरगाव 89, नगर ग्रामीण 74, नेवासा 52, पारनेर 48, पाथर्डी 29, राहाता 81, राहुरी 30, संगमनेर 37,  शेवगाव 2,  श्रीगोंदा 10, श्रीरामपूर 55, कॅन्टोन्मेंट 9 आणि इतर जिल्हा 11 अशा रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 1222 जणांचे मृत्यू झाले आहेत.

COMMENTS