नगरमध्ये नराधमाने केला 74 वर्षीय वृद्धेवर अत्याचार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरमध्ये नराधमाने केला 74 वर्षीय वृद्धेवर अत्याचार

अहमदनगर/प्रतिनिधी : अहमदनगर शहरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. शहरातील तारकपूर परिसरात एका 74 वर्षीय महिलेला मारहाण करून तिच्यावर अत्याचार

अहमदनगर जिल्ह्यात दोन कोटींची वीज चोरी पकडली
नेप्तीत आषाढी एकादशीनिमित्त महाभिषेक
शिर्डी विमानतळाकडे करापोटी थकलेले 6 कोटी रुपये त्वरित द्या

अहमदनगर/प्रतिनिधी : अहमदनगर शहरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. शहरातील तारकपूर परिसरात एका 74 वर्षीय महिलेला मारहाण करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलेच्या घरात घुसून गुरुवारी (11 नोव्हेंबर) मध्यरात्री एका नराधमाने हे कृत्य केले आहे. ही महिला एका पत्र्याच्या घरात राहते. मध्यरात्री आरोपीने घरात घुसून महिलेला मारहाण केली व तिच्या चेहर्‍यावर काचेची बाटली फोडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून, अतिशय क्रूर पध्दतीने मारहाण करत या महिलेवर अत्याचार करण्यात आला. दरम्यान, पीडित महिलेला उपचारासाठी अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून संशयित आरोपी राजू साहेबराव काते (राहणार बारस्कर कॉलनी, लालटाकी, अहमदनगर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घटनेच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी महिलेच्या शेजारी राहणारी व्यक्ती पाणी देण्यासाठी या महिलेच्या घरी गेले असता त्यांना ही महिला जखमी अवस्थेत घरात आढळून आली. त्यांनी तात्काळ शेजारील अन्य रहिवासांना माहिती देत जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करीत महिला जबाब नोंदवला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

COMMENTS