अहमदनगर/प्रतिनिधी : मंगलगेट येथील यश किराणा ट्रेडिंग दुकान फोडून चोरट्यांनी रोख रक्कम व तांदळाच्या 18 गोण्या असा 18 हजार 300 रुपयांचा माल चोरून नेला.
अहमदनगर/प्रतिनिधी : मंगलगेट येथील यश किराणा ट्रेडिंग दुकान फोडून चोरट्यांनी रोख रक्कम व तांदळाच्या 18 गोण्या असा 18 हजार 300 रुपयांचा माल चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि.10) घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अमोल टिल्लू गायकवाड (वय 36, रा. कॅम्प कौलारू, सर्जेपुरा) यांनी याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या यश किराणा ट्रेडिंग या किराणा दुकानात प्रवेश करून दुकानातील 18 तांदळाच्या गोण्या व रोख रक्कम चोरून नेली, असे फिर्यादीत म्हटले आहे. दुकानात चोरी झाल्याचे लक्षात येताच गायकवाड यांनी पोलिस ठाणे गाठत घटनेची फिर्याद दिली. तोफखाना पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी, पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंकी यांनी घटनास्थळी भेट दिली असून या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक शेख करीत आहेत.
COMMENTS