केडगावात एकाच दिवशी दोनजण झाले बेपत्ता

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केडगावात एकाच दिवशी दोनजण झाले बेपत्ता

अहमदनगर/प्रतिनिधी : क्षुल्लक कारणावरून दोन व्यक्ती आपापल्या घरात कोणाला काही एक न सांगता कोठेतरी निघून गेले. ही घटना नगर-पुणे रोडवरील केडगाव परिसराती

ओबीसी आरक्षणाशिवाय कोणतीही निवडणूक घेऊ नये : ओबीसी काँग्रेसची मागणी
स्थायी समितीने वाढवले 24 कोटीने बजेट ; आजपासून मनपा महासभेत होणार चर्चा
महीलांनो घाबरु नका.. आपल्या सोबत जनसेवा फौंडेशन कायम सोबत आहे : सौ. शालिनीताई विखे पाटील

अहमदनगर/प्रतिनिधी : क्षुल्लक कारणावरून दोन व्यक्ती आपापल्या घरात कोणाला काही एक न सांगता कोठेतरी निघून गेले. ही घटना नगर-पुणे रोडवरील केडगाव परिसरातील भूषणनगर आणि केडगाव देवी रोड येथे घडली. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात हरवल्याच्या दोन वेगवेगळ्या नोंदी घेण्यात आल्या. भावाला पैसे दिल्याच्या कारणावरून पत्नीस राग आल्याने पती-पत्नीमध्ये किरकोळ कौटुंबिक वाद झाला. त्या वादाचा मनात राग धरून संजय दगडू नलगे (वय 41, राहणार जेएलपी रेसिडेन्सी, भूषणनगर, केडगाव) हे गुरुवारी दिनांक 11 मध्यरात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास घरात कोणाला काहीएक न सांगता कुठेतरी निघून गेले. त्यांची पत्नी अंजली नलगे यांनी त्यांची वाट पाहिली. केडगाव परिसरात व इतरत्र त्यांचा शोध घेतला तसेच नातेवाईक व मित्रमंडळी यांच्याकडे विचारपूस केली, परंतु ते मिळून आले नाही. यावरून सौ. नलगे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. कोतवाली पोलिसांनी हरविल्याची नोंद घेतली आहे. अधिक तपास कोतवाली पोलिस करीत आहे. दुसर्‍या घटनेत केडगाव देवी रोडवरील हॉस्पिटल शेजारी राहत असलेले पॅथॉलॉजी लॅब चालक सचिन गौतम रणसिंग (वय 30) हे मी बाहेरून फिरून येतो, असे सांगून त्यांचे टीव्हीएस स्टार सिटी मोटरसायकलवर (क्रमांक एमएच सोळा बीके 176) बसून बाहेर निघून गेले. ते अद्याप घरी परतले नाही. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची वाट पाहिली तसेच बाहेर जाऊन पाहिले असता ते दिसून आले नाही. केडगाव परिसरात व इतरत्र त्यांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाही तसेच त्यांचे नातेवाईक व मित्रमंडळी यांच्याकडे चौकशी केली असता ते मिळून आले नाही तसेच त्यांच्याकडे असलेला मोबाईल नंबर 8624869279 व 9637740035 वर संपर्क साधला असता तो बंद लागला. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी रवीना रणसिंग यांच्या फिर्यादीवरून हरविल्याची नोंद केली. अधिक तपास कोतवाली पोलिस करीत आहे. सचिन रणसिंग यांचे वर्णन- उंची पाच फूट सहा इंच, शरीरबांधा मध्यम, रंग काळा सावळा, चेहरा उभट, नाक मोठे, केस बारीक, डोळे काळे, मिशी वाढलेली, अंगात गुलाबी रंगाचा फुल बाह्याचा शर्ट, त्यावर खाकी रंगाचे जाकीट, नेसणीस निळ्या रंगाची फुल पॅन्ट, पायात पांढर्‍या रंगाचे स्पोर्ट शूज असे आहे. यांच्याबाबत कुणाला काही माहिती असल्यास त्यांनी कोतवाली पोलिस ठाणे (फोन नंबर 0241-2416117 ) येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

COMMENTS