नगरकरांनी पाठवले खड्ड्यांचे तब्बल अकराशेवर फोटो…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरकरांनी पाठवले खड्ड्यांचे तब्बल अकराशेवर फोटो…

अहमदनगर/प्रतिनिधी- मागील सहा महिन्यांपासून खड्डेयुक्त झालेल्या नगर शहरातील रस्त्यांची डागडुजी करण्याची सदबुद्धी मनपा सत्ताधारी व प्रशासनाला मिळावी म्

स्नेहआशा बालगृहांमधील बालकांच्या मुत्यूची चौकशी
आई जगाचा पोशिंदा तर शेतकरी बाप व दिशा देणारा शिक्षक ः सुनील कडलग
जागतिक विमा परिषदेसाठी सुनील कडलग यांची निवड

अहमदनगर/प्रतिनिधी- मागील सहा महिन्यांपासून खड्डेयुक्त झालेल्या नगर शहरातील रस्त्यांची डागडुजी करण्याची सदबुद्धी मनपा सत्ताधारी व प्रशासनाला मिळावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने उपरोधिक स्वरुपात आयोजित केलेल्या खड्डे फोटो स्पर्धेला नगरकरांनी गांभीर्याने घेत उत्स्फूर्तपणे चक्क अनेकविध खड्ड्यांचे अकराशेवर फोटो पाठवले आहेत. या स्पर्धेसाठी अजूनही दोन दिवस शिल्ल्लक असून, नगरकरांनी खड्ड्यांचे आणखी फोटो पाठवण्याचे आवाहन मनसे विद्यार्थी सेनेने केले आहे. दरम्यान, या स्पर्धेतून मनपाचे वाभाडे निघाले आहे.
नगरकर सध्या रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांच्या सर्वात मोठ्या त्रासातून जात आहेत. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या राक्षसाचा सामना करीत प्रशासन निर्मित नागरी सुविधांतील दिरंगाईच्या राक्षसाला देखील तोंड देण्याची वेळ नगरकरांवर आलेली आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने जी खड्डे फोटो स्पर्धा आयोजित केली, ती फक्त स्पर्धा नसून मनपा प्रशासनाच्या नाकर्तेपणाचे प्रदर्शन प्रशासनालाच दाखवण्यासाठी जनतेने घेतलेला पुढाकार आहे, असे या स्पर्धेचे संयोजक व मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी सांगितले. महापालिका आपली जबाबदारी प्रत्येक गोष्टीत झटकताना दिसत आहे. सर्वसामान्यांना पायाभूत गरजच जर मिळत नसतील तर हे प्रशासन, महापौर, आमदार, खासदार, नगरसेवक हे काम काय करतात, असा प्रश्‍न लोकांना पडलेला आहे. गेल्या दोन दिवसापासून मनविसेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून 1100 पेक्षा जास्त खड्ड्यांचे फोटो आमच्याकडे आलेले आहेत. यापैकी काही फोटोंना नगरकरांनी मोठ्या तळमळीने तळतळ करून झालेली ईजा आणि दुखापतीसह या खड्ड्यांचे फोटो पाठवले. त्यांच्या रोषाला आयुक्तांना सामोरे जावे लागणार आहे. आयुक्तांच्या हस्ते या फोटोंना असे काही बक्षीस देण्यात येईल की, आयुक्तांनी तात्काळ रस्त्यांच्या डागडुजीसाठी पुढाकार घेतला पाहिजे, हा यामागील प्रामाणिक प्रयत्न आहे. अजून दोन दिवस ही स्पर्धा चालणार आहे. नगरकरांनी यामध्ये सहभाग घ्यावा व आपापल्या भागातील-प्रभागातील खड्ड्यांचे फोटो 9657457661 या व्हाट्सअप नंबरवर पाठवावे, असे आवाहन वर्मा यांनी केले आहे.

COMMENTS