नक्षलवादी हल्ल्यात 22 जवानांना हौतात्म्य ; सातशे सैनिकांना घेरून केला हल्ला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नक्षलवादी हल्ल्यात 22 जवानांना हौतात्म्य ; सातशे सैनिकांना घेरून केला हल्ला

बस्तरच्या बिजापूरमध्ये शनिवारी नक्षलवाद्यांनी सातशे जवानांना घेरून हल्ला केला.

ओबीसी आरक्षण वगळून निवडणुका झाल्यास मतदानावर बहिष्कार : नंदकुमार कुंभार
उपेंद्र कुशवाहांनी सोडली नितीश कुमारांची साथ
असल्फा विभागात जलवाहिनी फुटल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप 

रायपूरः बस्तरच्या बिजापूरमध्ये शनिवारी नक्षलवाद्यांनी सातशे जवानांना घेरून हल्ला केला. या हल्ल्यात 22 जवानांना हौतात्म्य आले. खरेतर ही संख्या 30 झाल्याची शक्यता आहे. 20 जवानांचे मृतदेह घटनास्थळी दिसत आहेत. येथे रेस्क्यू टीम अजूनही पोहोचलेली नाही. 

केंद्रीय राखीव दलाचे सात कर्मचारी आणि छत्तीसगडचे 15 पोलिस कर्मचारी अद्याप बेपत्ता आहेत. ज्या ठिकाणी चकमक झाली, त्या भागात नक्षलवाद्यांच्या फर्स्ट बटालियनचा परिसर आहे. 20 दिवसांपूर्वी यूएव्ही छायाचित्रांमधून मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांची उपस्थितीची माहिती मिळाली होती. सुरक्षादलांना जोनागुडाच्या टेकड्यांवर नक्षलवाद्यांनी तळ ठोकल्याची माहिती मिळाली होती. शुक्रवारी रात्री सीआरपीएफच्या कोब्रा कमांडोज, सीआरपीएफ बस्तरिया बटालियन आणि विशेष टास्क फोर्सच्या दोन हजार जवानांनी कारवाई सुरू केली; परंतु शनिवारी नक्षलवाद्यांनी 700 सैनिकांना घेराव घातला आणि तीन बाजूंनी गोळीबार केला.

पोलिस महानिरीक्षक पी. सुंदरराज म्हणाले, की कोंटा क्षेत्र समिती, पालमेड क्षेत्र समिती, जागरगुंडा क्षेत्र समिती आणि बासागुडा क्षेत्र समितीमधील 180 नक्षलवादी व्यतिरिक्त सुमारे 250 नक्षलवादी होते. नक्षलवाद्यांनी मृतदेह दोन ट्रॅक्टरमध्ये नेल्याची माहिती मिळाली आहे. बिजापूर-सुकमा जिल्ह्याचा सीमा भाग जोनागुडा नक्षल्याचा प्रमुख परिसर आहे. नक्षलवाद्यांची बटालियन आणि बर्‍याच प्लाटून येथे नेहमीच असतात. या संपूर्ण भागाची कमान नक्षलवादी सुजाथा या महिलेच्या ताब्यात आहे. जवानांवर नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला होण्याची शक्यता अधिकार्‍यांनी आधीच वर्तवली होती. याच कारणामुळे संपूर्ण भागात दोन हजाराहून अधिक सैनिक उभे होते. पहिल्या गोळीबारात मोठे नुकसान झाले; पण सैनिकांनी आपले धैर्य गमावले नाही आणि तीनपेक्षा जास्त नक्षलवाद्यांना ठार करत नक्षलवाद्यांचा घेराव तोडून काढला. जखमी सैनिक आणि जवानांचे मृतदेह नक्षलवाद्यांमधून बाहेर काढले गेले. 

दरम्यान, सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंग छत्तीसगडला पोहोचले आहेत. बिजापूरमध्ये कारवाईनंतर गृहमंत्रालयाने त्यांना त्या ठिकाणी जाण्याची सूचना केली. गृहमंत्री अमित शाह विजापूरला डीजी पाठवण्याबरोबर छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, की सैनिकांचे बलिदान कधीही विसरणार नाही. हौतात्म्य आलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. 

24 तास मृतदेह जागीच

या घटनेला तब्बल 24 तास उलटून गेले आहेत; मात्र तरीही जवानांचे मृतदेह अद्याप त्याचठिकाणी असून ते बाहेर काढण्यात आले नाहीत. घटनास्थळी जवानांच्या मृतदेहांचा अक्षरशः खच पडल्याचे चित्र आहे. सुरक्षा दलाने किमान 15 नक्षलवादी ठार झाल्याचा दावा केला आहे. 

COMMENTS