नऊ दुर्गांनी केला मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नऊ दुर्गांनी केला मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प

अहमदनगर (प्रतिनिधी)-  फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त नागरदेवळे (ता. नगर) येथे मोफत आरोग्य, नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक

भारताची वाटचाल महासत्तेकडे दिमाखात होत आहे- नानासाहेब जाधव
Ahmednagar : जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची लोकमंथन कार्यालयास भेट (Video)
Ahmednagar : वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्जत तालुक्यातील डॉक्टरांचा सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)- 

फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त नागरदेवळे (ता. नगर) येथे मोफत आरोग्य, नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. या शिबीरात नऊ दुर्गांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करुन समाजात नेत्रदान चळवळीत योगदान देण्याचे आवाहन केले. शिबीराला ज्येष्ठ नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला.  

गावातील संत सावता महाराज मंदिर येथे घेण्यात आलेल्या या शिबीराचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, किरण कवडे, डॉ. विशाल घंगाळे, डॉ. शरद कौठुळे, राजेंद्र बोरुडे, वैभव दानवे, वैभव देशमुख आदी उपस्थित होते.

जालिंदर बोरुडे म्हणाले की, फिनिक्स फाऊंडेशनने गरजू घटकांसाठी आरोग्य सेवेचे महायज्ञ अविरतपणे सुरु ठेवले आहे. मागील वीस ते पंचवीस वर्षापासून दृष्टीदोष असलेल्या सर्वसामान्य घटकांवर मोफत उपाचर करण्यासाठी फाऊंडेशनचे कार्य करीत आहे. लाखोंच्या संख्येने दृष्टीहीनांना नवदृष्टी देण्याचे काम करण्यात आले. तर कोरोनाच्या संकटकाळात देखील गरजू घटकांसाठी शिबीर घेण्यात आले. नेत्रदान व अवयवदान चळवळीत देखील फाऊंडेशनचे कार्य सुरु असून, अनेक दृष्टीहीनांना नेत्रदानाच्या माध्यमातून नवदृष्टी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. शरद कौठुळे म्हणाले की, फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून जालिंदर बोरुडे यांनी स्वत:ला सामाजिक कार्यात वाहून घेतले आहे. माणुसकीच्या भावनेने सर्व समाजातील गरजू घटकांना शिबीराच्या माध्यमातून आधार दिला जात आहे. निस्वार्थ भावनेची फिनिक्सची सामाजिक चळवळ सुरु आहे. नवरात्र उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या शिबीराचा लाभ सर्वसामान्यांना मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.

या शिबीरात 253 रुग्णांची आरोग्य व नेत्र तपासणी करण्यात आली. विशेषता: महिलांसाठी मधुमेह, रक्तदाब व हिमोग्लोबीनची तपासणी करण्यात आली. शिबीरात ग्रामस्थांसाठी कोरोना लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच शिबीरार्थींची कोरोना आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. या शिबीरातून निवड झालेल्या 43 रुग्णांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी न करता शासनाच्या नियमांचे पालन करुन हे शिबीर घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव दानवे यांनी केले. आभार राजेंद्र बोरुडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौरभ बोरुडे, आकाश धाडगे, गौरव बोरुडे, बाबासाहेब धीवर, रतन तुपविहीरे आदींसह फिनिक्स फाऊंडेशनचे सदस्य व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

COMMENTS