नगर - शहरातील अनेक धार्मिक स्थळांना गेल्या अनेक वर्षांपासून मनपाच्यावतीने जादा कर आकारणी होत होती. त्यामुळे अनेक धार्मिक स्थळांची थकबाकी वाढत होत
नगर –
शहरातील अनेक धार्मिक स्थळांना गेल्या अनेक वर्षांपासून मनपाच्यावतीने जादा कर आकारणी होत होती. त्यामुळे अनेक धार्मिक स्थळांची थकबाकी वाढत होती, तसेच अनेकांनी ती भरलीही परंतु याबाबत आपणास सांगितल्यानंतर कायदेशीर माहिती घेतल्यावर कलम 132 (1) ब नुसार धार्मिक स्थळांकडून कर आकारणी केली गेली पाहिजे. असे असतांना मनपाकडून जादा आकारणी होत असल्याने संबंधितांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर ही जादा आलेली कर आकारणी कमी करण्यात आली किंवा ज्यांनी भरली त्यांची समायोजित केली. धार्मिक स्थळातून कोणत्याही प्रकारचे उत्पन्न मिळत नसल्याने त्यांना करात सवलत देणे क्रमप्राप्त आहे. याबाबत आपण शहरातील सर्वधर्मियांच्या धार्मिक स्थळांची जादा आलेली कर कमी करण्यासाठी मनपाच्या सहकार्याने प्रयत्न केले आहेत. अजूनही कोणत्या धार्मिक स्थळांना कराबाबत शंका असल्याचे त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केले.
गंजबाजार येथील मदन मोहनलालजी मंदिर ट्रस्टला जादा आलेली मनपाची कर आकारणी कमी केल्याचे पत्र नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी अध्यक्ष देवेंद्र गांधी यांच्याकडे सुपूर्द केले. याप्रसंगी विशाल वालकर, उपाध्यक्ष कन्हैय्या शाह, मनोज गुजराथी, मदन गुजराथी, सतीश गुजराथी, मयुर बार्शीकर, नितीन गुजराथी, पंकज जामगांवकर, रामदास गुजराथी आदि उपस्थित होते.
याप्रसंगी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष देवेंद्र गांधी म्हणाले, गुजराथी समाजाचे श्रद्धास्थान असलेले गंजबाजार येथील मदन मोहनलालजी मंदिरात धार्मिक कार्य होत आहे. या ट्रस्टच्यावतीने नेहमीच सर्व शासकीय नियमांचे पालन करुन विविध उपक्रम राबविले जात असतात. परंतु गेल्या काही वर्षांपासून मनपाच्यवतीने जादा कर येत असल्याचे जाणवल्याने याबाबत नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यांच्या प्रयत्नाने आज 2003-04 पासून आकारणी करण्यास मंजूरी मिळाली आहे, त्यानुसार मंदिर ट्रस्टची सुमारे 1,33,551 रुपयांची जादा रक्कम समायोजित करण्यात आली आहे. त्यामुळे मंदिर ट्रस्टचा मोठा आर्थिक फायदा झाला असून, त्याचा विनियोग धार्मिक कार्यास हातभार लागेल. त्यामुळे नगरसेवक बाळासाहेब बोराटे व विशाल वालकर यांचे ट्रस्टच्यावतीने आभार मानतो, असे सांगितले.
याप्रसंगी नितीन गुजराथी यांनी सूत्रसंचालन केले तर उपाध्यक्ष कन्हैय्या शाह यांनी आभार मानले.
COMMENTS