धक्कादायक… नगर येथील सामाजिक कार्यकर्त्या महिलेवर पोलिसाकडून अत्याचार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धक्कादायक… नगर येथील सामाजिक कार्यकर्त्या महिलेवर पोलिसाकडून अत्याचार

अहमदनगर/प्रतिनिधी केडगाव परिसरातील एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेस तोफखाना पोलिस ठाण्यातील पोलिसाने कार मध्ये नेऊन तिच्यावर जबरदस्तीने शारिरीक संब

श्रीरामपुरात बिबट्याचा तरुणांवर हल्ला ….
टाकळी ग्रामस्थांनी घेतला केवळ वृक्ष लागवड नव्हे; संवर्धनचाही वसा
मोफत गणवेशामुळे शिक्षकांसह पालकांना मनस्ताप!

अहमदनगर/प्रतिनिधी

केडगाव परिसरातील एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेस तोफखाना पोलिस ठाण्यातील पोलिसाने कार मध्ये नेऊन तिच्यावर जबरदस्तीने शारिरीक संबंध केले. व शिवीगाळ करुन धमकी दिली.ही घटना नगर मनमाड रोड वरील विळदघाट येथील निंबळक बायपास रोड पुढे 500 मीटर अंतरावर डाव्या बाजूला कच्च्या रस्त्यावर निर्जन ठिकाणी मंगळवारी ( दिनांक 4 ) रात्री 7-45  ते  8-45 वाजण्याच्या दरम्यान घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की तोफखाना पोलिस ठाण्यातील पोलिस शकील सय्यद याने त्याच्या  पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये केडगाव परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या 27 वर्षीय महिलेस बसून वेळद घाट येथील निंबळक बायपास रोड टुडे असे मीटर आत गेल्यावर डाव्या बाजूला जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने वीस फूट आत जाऊन येथील निर्जन ठिकाणी नेले व जबरदस्तीने तिच्याबरोबर शारीरिक संबंध केले. 

त्यानंतर तिला अर्वाच्य शिवीगाळ करून हे जर कोणाला सांगितले तर मी तुझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करील असे म्हटले व मी एक पोलिस आहे माझे मोठ मोठ्या गुन्हेगारांची संबंध आहे असे म्हणून मी तुला कापून फेकून देईन अशी धमकी दिली. या घटनेने मानसिक धक्का बसल्याने व मनस्थिती ठीक नसल्याने सामाजिक कार्यकर्ता महिला महिला पोलीस स्टेशनमध्ये जाण्याच्या मनस्थितीत नव्हती. 

त्यानंतर सदर महिलेने शनिवारी दिनांक 9 रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात जाऊन  पोलिस कर्मचारी सय्यद याच्याविरुद्ध भादवि कलम 376 एक 504 506 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे हे करीत आहे

COMMENTS